सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधीची विकासकामे पुर्ण करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संपुर्ण मतदारसंघात विकासाचा झंजावात अखंड चालू ठेवला आहे. राजकीय गट- तट न पाहता विकासकामे केल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे हे एक लोकाभिमुख नेतृत्व असल्याचे अधोरेखीत झाले आहे. दुर्गम आणि डोंगराळ जावलीच्या खोर्यातील खेड्यापाड्यांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे सोन्याचे दिवस आले आहेत. कोट्यवधीची विकासकामे खेचून आणत आमदारांनी आपल्या कतृत्वाचा नारा जावलीच्या दर्याखोर्यात घुमवला आहे. मेढा पंचायत समितीची प्रशासकीय इमारत, न्यायालयाची सुसज्ज इमारत, पोलीस ठाण्याची इमारत, ग्रामीण रुग्णालयांसाठी प्रशस्त इमारत व कर्मचारी निवासस्थान आदीसाठी कोट्यवधी रुपये निधी मिळवून देऊन ही सर्व कामे मार्गी लावली. मेढा ग्रामिण पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी १ कोटी ६९ लाखाचा निधी मिळवला. गेली ३० वर्ष रखडलेल्या कुसुंबी- कोळघर रस्त्यासाठी ९० लाखाचा निधी उपलब्ध करुन या रस्त्याचा प्रश्न महतप्रयासाने मार्गी लावला. वेण्णा नदीवरील भामघर पुलासाठी ६० लाख, खर्शी बारामुरे रस्त्यावरील मोठ्या पुलासाठी ४० लाख, पावगणी कुडाळ रस्ता व महू गावाजवळच्या पुलासाठी दोन कोटी ६० लाखण एकीव ते दुंद रस्त्यासाठी १ कोटी ४० लाख निधी मिळवून दिला तर याच रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. बोंडारवाडी धरण, महू- हातगेघर रिंगरोडचे काम आणि या धरणाच्या प्रलंबीत कामांना चालना दिली. कोयना पुर्नवसीत गावांना नागरी सोयी- सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मेढा ते सातारा रस्त्यासाठी २५ लाख, आलेवाडी खिंड पदमलेमुरा, रेंगडीमुरा धनगर पेढा रस्त्याच्या कामासाठी ८२ लाख, रेंगडीमुरा- मेढा रस्त्यावरील पुलासाठी १ कोटी ५० लाख रुपये निधी मिळाला. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी गेल्या पाच वर्षात सातारा आणि जावली मतदारसंघातील विकासकामांसाठी कोट्यवधी निधी उपलब्ध करुन दिला. बहुसं‘य कामे मार्गी लागली असून उर्वरीत सर्वच कामे प्रगतीपथावर आहेत. दुर्गम अशा जावली तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधीची विकासकामे करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्याच्या राजकारणात एक आदर्श निर्माण केला आहे. डोंगराळ भागातील प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडून प्रत्येक गावात अंगणवाडी, प्राथमिक शाळेच्या इमारती बांधून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या भागातील जनतेला खर्या अर्थाने ज्ञानाची कवाडे खुली करुन दिली आहेत. केवळ विकासकामे करण्याकडेच कल न ठेवता आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीही सातत्याने प्रयत्न केले आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून विकासाचा झंजावात असाच सुरु राहणार असून येत्या काही दिवसांत सातारा- जावली मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलेला पहावयास मिळेल हे निश्चित !
Home Politics|Satara District Satara City सातारा- जावली विकासाचा झंजावात म्हणजे आ श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले. अमोल मोहिते





