सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया सुरू झाली.शाहू स्टेडियम समोरील आयटीआय शिक्षण शाळा मतदान केंद्रावर बाजार समितीच्या दोन कर्मचाऱ्यांनी पोलिसांना चकवून घुसखोरी केल्याने काही काळ वातावरण तणावाचे बनले होते ही चलाखी बाजार समितीचे माजी संचालक काका धुमाळ यांच्या लक्षात आल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले यावेळी कर्मचाऱ्यांना धुमाळ यांनी चांगलेच खडे बोल सुनावले या प्रकारामुळे पोलीस काय बघ्याची भूमिका घेत होते काय हा प्रश्न निर्माण झाला आहे
सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अजिंक्य पॅनलला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी विकास पॅनल आव्हान दिले आहे दोन्ही पॅनेल यंदाच्या निवडणुकीत आमने-सामने आल्यामुळे निवडणूक चुरशीची होईल अशी चिन्हे आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलला खासदार छ उदयनराजेंचा पाठिंबा असल्यामुळे ही निवडणूक जोरदार होणार असेच राजकीय अंदाज वर्तवले जात आहेत रविवारी येथील iti शिक्षण शाळेच्या मतदान केंद्रावर सकाळी आठ वाजल्यापासून मतदान सुरू झाले सकाळी पावणे अकराच्या दरम्यान बाजार समितीचे काही कर्मचारी थेट मतदान केंद्रात घुसल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता पोलिसांची नजर चुकवून हे कर्मचारी आज कसे काय आले हे मात्र समजू शकले नाही दरम्यान बाजार समितीचे माजी संचालक व छ उदयनराजे समर्थक काका धुमाळ हे तेथे मतदान केंद्र आले असता त्यांच्याही बाब लक्षात आली त्यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली धुमाळ यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत खडे बोल सुनावले तुम्ही इथे येण्याचा काय संबंध बाजार समितीचे कर्मचारी येथे प्रचार करायला आलेत का असा खडा सवाल त्यांनी केला यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मतदान केंद्रावर केवळ मतदारांना आणि परवाना प्राप्त ठराविक व्यक्तींना प्रवेश दिला जात होता मग हे कर्मचारी आलेच कसे असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त असतानाही परस्पर घुसखोरी झाल्याने एकूणच पोलीस बंदोबस्ताचे गांभीर्य स्पष्ट झाले आहे काका धुमाळ यांनी या प्रकारावरती आक्षेप नोंदवत संबंधित प्रकाराची जिल्हा उपनिबंधककान कडे तक्रार करणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले