क्रशर व फार्म हाऊस सिल करण्याचे आदेश भोसले बंधूंना दणका

3921
Adv

बनावट कागदपत्रे सादर करुन, सातारा तालुक्यातील परळी खो-यांतील मौजे पुनवडी,येथे सर्वे नंबर46/8 व 47/4 मधील खाणपटटा आणि स्टोनक्रशर तसेच उरमोडी धरणालगत सौ.आशा राजु भोसले आणिसौ.पल्लवी संतोष भोसले यांनी बेकायदेशीररित्या बांधलेल्या अलिशान फार्म हाऊसचे बांधकाम, यासंदर्भातील सर्व कागदपत्रांची छाननी होवून, रेकॉर्डवर येणा-या माहीतीसह तहसिलदार,सातारा यांनी अहवाल सादर करे
पर्यंत,क्रशर तातडीने सिल बंद करण्याचे आणि फार्म हाऊस सिल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी,सातारा यांनी दिले आहेत अशी माहीती ग्रामस्थ मंडळ पुनवडीचे अध्यक्ष सुधीर देसाई आणि संकल्प इंजिनिअरिंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी दिली आहे.

मौजे पुनवडी,ता.सातारा येथील सर्वे नंबर 46/8 आणि 47/4 या ठिकाणी,बनावट कागदपत्रे, जसे कीना हरकत दाखला इत्यादी बनावट पध्दतीने जोडून,स्टोनक्रशर बेकायदेशिर पणे चालवला जात आहे. याक्रशरमुळे प्रचंड प्रमाणात प्रदुषण होत आहे. धरणापासून अत्यंत जवळ असलेल्या या क्रशरमुळे वनसंपत्ती आणि जलसंपत्तीला मोठया प्रमाणावर बाधा निर्माण होत आहे.स्टोन क्रशरला पुनवडी ग्रामपंचायतीच्या एनओसी
शिवाय लगतच्या दुस-याच ग्रामपंचायतीची एनओसी जोडलेली आहे. क्रशरची जागा बिगरशेती असणे आवश्यक असताना, आजपर्यंत शेतीजागेवर क्रशर चालवला जात आहे.जिल्हाधिकारी यांचे परवानगी शिवाय येथे सुरुंग लावून दिवसरात्र खाणकाम आणि स्टोन क्रशर सुरु असतो.अश्या पध्दतीने शासनाची दिशाभुल केली आहे.त्यामुळे संबंधीतांवरजरुर ते फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहीजे आणि क्रशर बंद करावाअशी
मागणी ग्रामस्थांनी वेळोवेळी केली आहे.

तसेच संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्था तर्फे चिन्मय कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडे दाखल केलेल्या तक्रारीत,सौ.आशा राजु भोसले आणि सौ.पल्लवी संतोष भोसले यांनी उरमोडी धरणालगत बेकायदेशिररित्या अलिशान फार्म हाऊस आणि अन्य अनाधिकृत बांधकामकेले आहे.सदर निवासी इमारतीच्या सांडपाण्याचा निचरा होण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही त्यामुळे या बांधकामाचे सांडपाणी जमिनीत मुरुन लगतच असलेल्या धरणाच्या पाण्यात मिसळत आहे. फार्म हाऊस म्हणजे शेती अवजारे ठेवण्यासाठी केलेल कच्चे बांधकाम असा सरळ अर्थ असताना या ठिकाणअनाधिकृत रित्या सक्षम परवानग्या न घेता अलिशान बांधकाम करण्यात आले आहेत.शासन निर्णयानुसार पूर पातळीपासून (वॉटर लेव्हल) 200 मिटरच्या आत कोणतेही बांधकाम करता येत नाही असे नियम आहेत.परंतु सदरचे फार्म हाऊसचेबांधकाम पूरपातळीपासून अंदाजे 100 फुट इतके जवळ आहे. तसेच सदरचे बांधकाम हे उरमोडी जलाशयाचेसंपादीत क्षेत्रामध्ये अतिक्रमण करुन केले असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, सर्व नियम धाब्यावर बसवून,केलेले बांधकाम पाडण्यात यावे अशी तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे दाखल केली होती.या संदर्भात दिनांक 17/04/2023 रोजी जिल्हाधिकारी साहेब यांनी विशेष बैठक बोलावली होती.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा पोलिस प्रमुख,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकारी, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता,वीज वितरणचे अधिक्षक अभियंता,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,जिल्हा अधिक्षक, भुमि अभिलेख,प्रादेशिक प्रदुषण नियंत्रण मंडळाचेअधिकारी, सातारा प्रांत,उरमोडीचे कार्यकारी अभियंता,तहसिलदार, सातारा,जिल्हा खनिकर्म अधिकारी,गटविकास अधिकारी, सातारा यांचेसह अनेक अधिकारी उपस्थित होते.या बैठकीचे अधिकृत इतिवृत्त नुकतेच प्राप्त झाले असून, त्या इतिवृत्तानुसार तातडीने स्टोनक्रशर सिल बंद करावा आणि फार्महाऊस तातडीने सिल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनीतहसिलदार, सातारा यांना आदेश दिलेले आहेत. क्रशर तातडीने बंद करावा आणि झालेल्या उत्खननाचा अहवाल मोजणी करुन तहसिलदार सातारा यांनी सादर करावा आणि फार्म हाऊसला परवानगी कोणी दिली, नाहरकत प्रमाणपत्र कोणी कोणी दिली आहेत, त्या संबंधीतांना अश्या परवानग्या देण्याचे अधिकार आहेत इत्यादी
बाबींविषयी अहवाल तातडीने सादर करावेत तसेचफार्महाऊसच्या जागेसह सरकारी जागेची मोजणी करण्याचेजिल्हाधिकारी यांनी जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख आणि अधिक्षक अभियंता, जलसंपदा विभाग यांना आदेशदिलेले आहेत अशी माहीती संकल्प इंजिनिअरिंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी आणि ग्रामस्थमंडळ, पुनवडीचे अध्यक्ष सुधीर देसाई यांनी संयुक्त पत्रकाव्दारे दिली आहे.

Adv