खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांच्या अफलातून कार्यशैलीमुळे सातत्याने चर्चेत असतात काही दिवसापूर्वी भाजपच्या आमदारांना धमकी देणाऱ्यांना माझ्यावर सोपवा मी बघून घेतो असा शब्द खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला होता या चर्चेत असलेले उदयनराजे येथील सेव्हन स्टार चित्रपट गृहात भिरकिट चित्रपट पाहण्यासाठी तीनशे कार्यकर्त्यांसह उपस्थित झाले . खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी आपल्या नव्या आणि जुन्या अशा तीनशे समर्थकांसह राजकीय पाश्र्वभूमी असणाऱ्या भिरकिट चित्रपटाचा आनंद लुटला . खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंचा एंटरटेनमेंट प्रोग्राम चांगलाच चर्चेत राहिला आहे
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांच्या अफलातून कार्यशैलीमुळे तसेच बेधडक विधाने व धक्कातंत्रा मुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळे वजन ठेवून आहेत राज्यात सुरु असलेल्या सत्ता नाट्य मध्ये धमकी देणार्यांना बघून घेऊ असा इशारा देऊन उदयनराजे यांनी महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले साताऱ्यात सोमवारी रात्री श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या तीनशे कार्यकर्त्यांना घेऊन येथील सेव्हन स्टार चित्रपटगृहांमध्ये चित्रपटासाठी आपल्या समर्थकांसह लावलेली हजेरीची साताऱ्यात चांगलीच चर्चा रंगली .
यंदा सातारा विकास आघाडीच्या गोटात बरेच नवे चेहरे दिसणार असण्याची शक्यता आहे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांची ऑन स्क्रीन भिरकीट चांगलीच चर्चेत राहिली






