सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी आकर्षक मखर खरेदी करण्याची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवार पेठेतील अथर्व डिजिटल येथे विविध आकर्षक डिझाईनच्या गणपती मखरांची खरेदी करण्यासाठी सातारकरांची मोठी गर्दी होत आहे.
गणेशमूर्तीला शोभून दिसणारे पारंपरिक तसेच आधुनिक पद्धतीचे विविध मखर, आकर्षक सजावट आणि ग्राहकांच्या पसंतीनुसार उपलब्ध पर्याय यामुळे अथर्व डिजिटल हे गणेशोत्सवातील मखर खरेदीसाठी सातारकरांच्या पसंतीचे ठिकाण ठरत आहे.
गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच ग्राहकांची मखर खरेदीसाठी गर्दी वाढली असून, आपल्या बाप्पासाठी सुंदर आणि आकर्षक सजावट करण्यासाठी नागरिक अथर्व डिजिटलला पसंती देत आहेत. गणेशभक्तांच्या वाढत्या प्रतिसादामुळे गुरुवार पेठ परिसरातही गणेशोत्सवाची उत्साहाची चाहूल लागली आ






