अस्सल सातारी रोखठोक स्वभाव आणि बेधडकपणा म्हणजे छ उदयनराजे

168
Adv

अस्सल सातारी रोखठोक स्वभाव आणि बेधडकपणा म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.
श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या नावाचं मोठं वलय महाराष्ट्रातील तरुणाईवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा त्यांना अभिमान आहे. कधी मैत्री, कधी भांडण, कधी तह तर कधी तत्काळ झालेली गळाभेट अशी अनेक वळणं घेत आमची निखळ मैत्री मागील तेहतीस वर्षांपासून आहे. त्याला जीवापाड, जिगरी, खास दोस्ती हे शब्दही अपुरे पडतील.उदयनराजेंची मैत्री माझ्यासह सर्वस्तरात आहे. हीच त्यांची ताकद आहे.
उदयनराजे यांचा चाणाक्षपणा, राजकीय अभ्यास, अस्सल सातारी रोखठोक स्वभाव अणि बेधडकपणा याचे तरुणांबरोबरच सामान्य नागरिकांना प्रचंड आकर्षण आहे. त्यांच्याविषयी काही जणांना आदरयुक्त भीती आहे तर काही जणांना अकारण भीती वाटते. परंतु काहीही असले तरी वरील दोन्ही विचारांचे लोक अंतिमतः महाराजसाहेबांचा शब्द प्रमाण मानतात. असे अलौकिक व्यक्तिमत्त्व लाभलेले उदयनराजे हे एक दिलदार मित्रही आहेत.
गोरगरीब जनतेच्या प्रश्नांवरून खासदार उदयनराजे भोसले राज्य सरकारला व प्रशासनाला धारेवर धरतात. एक तर न्याय द्या अन्यथा विष पिऊन मरू द्या .जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला व सरकारला गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात असं सुनावायला ते कमी पडत नाहीत.
सरकारी कर्मचाऱ्यांशी केलेली अरेरावी असो, की रात्री बारानंतर डीजे वाजवण्याचं केलेलं समर्थन असो, उदयनराजे दहशत माजवतात, लोकांना दमबाजी करतात, असा त्यांच्यावर आरोप होतो.पण, ही जनतेच्या प्रेमाची दहशत आहे, असं स्पष्टीकरण ते या आरोपावर देतात.
उदयनमहाराज मुळात राजकारणी नाहीत. ते समाजकारणी आहेत आणि त्यांची मोठी लोकप्रियता राजकीय लोकांच्यातही आहे.त्यांनी कधीही कुणालाही शिवीगाळ केली नाही तसंच ते सरकारी कर्मचाऱ्यांशी मित्राप्रमाणे वागतात.
उदयनराजे यांना रात्री मित्रांना बरोबर घेऊन शहरात फेरफटका मारण्याची सवय आहे. असंच फिरताफिरता एकदा ते साताऱ्यातील बस स्टँडजवळ पोहोचले. तेव्हा तिथं काही रिक्षावाले उभे होते. ‘रात्री दोन वाजलेत, तुम्ही एवढ्या रात्री अजून व्यवसाय करत आहात… तुम्हाला आयुष्य, आराम आहे, की नाही.’ असे म्हणत त्यांनी प्रत्येकाच्या हातात पाचशे रुपयांची नोट ठेवली. आता घरी जाऊन झोपा, असा सल्ला त्यांना दिला. त्यांच्या ह्रदयात असलेल्या मानवतेचे हे उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणे त्यांच्याबद्दल साताऱ्यात सांगितली जातील.
ते अनेकदा शरद पवारांकडे जातात,शरद पवार उदयनराजेंच्या कायम पाठीशी राहिले आहेत.तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा त्यांच्या पाठीशी आहेत. छत्रपतींच्या घराण्याविषयी आणि त्यांच्या वंशाच्या विषयी दोघांनाही मोठा आदर आहे. आणि त्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री अमितजी शहा वारंवार अभिमानाने करत असतात. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची आणि उदयनराजे यांची मैत्री सर्वश्रुत आहे, तशीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांची चांगली घनिष्ठ मैत्री आहे.
साताऱ्याच्या विकासात देवेंद्र फडणवीस यांचेही मोठे योगदान आहे. उदयनराजेंनी सुचविलेली अनेक विकास कामे त्यांनी मंजुर करून भरीव निधी विकास कामी दिला आहे.दोघांची मैत्रीही सर्वश्रुत आहे.

साताऱ्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी उदयनराजे यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे.तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उद्धव ठाकरे, अजित पवार, राज ठाकरे यांच्याशीही मस्त मैत्री आहे. अनेक केंद्रीय व राज्यातील मंत्र्यांना साताऱ्याच्या प्रश्नांसाठी भेटतात, पाठपुरावा करतात. सर्व राजकीयपक्षांत त्यांचे मित्र आहेत. कोणताही राजकीय पक्ष त्यांना वर्ज्य नाही.त्यामुळे ते रोखठोकपणे मी कुणाला मानत नाही, जनता हाच माझा पक्ष, असं बेधडकपणे ते म्हणतात.
राजघराण्याचा थेट वारसा लाभलेले उदयनराजे दिसायला चेहऱ्यावर राकट व करारी बाण्याचे असले तरी मनाने मात्र कमालीचे हळवे आहेत. मागील काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा नेत्यातील भाषणात होत असणारा अपमर्द पाहून ते कमालीचे हळवे आणि बेधडक व आक्रमक झालेले सर्वांनी पहिले.यावेळी रोखठोक होत त्यांनी असं वक्तव्य करणाऱ्यांचा मोठ्यातमोठे असणाऱ्यांचाही समाचार घेतला.

उदयनराजेंचं राजकारणच असं आहे की त्यात ते आज टीका करतात आणि उद्या मिठी मारतात.
ते काही चोवीस तास द्वेष डोक्यात ठेवून राजकारण करत नाहीत.
व्यक्तीचा द्वेष करण्यापेक्षा त्याच्या प्रवृत्तीचा द्वेष केला पाहिजे असे ते म्हणतात.
कोणतीही कटुता कायम न ठेवता . दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
चुकीचं काम केलं असेल तर शिक्षा ही झालीच पाहिजे. मग त्या ठिकाणी उदयनराजे का असेना,” .
लोकशाहीत सर्व लोकप्रतिनिधींनी नैतिक जबाबदारीने वागायला हवं. कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. चुकीचं केलं असेल तर शासन व्हायलाच हवं. त्याठिकाणी उदयनराजे असले तरी शासन हे व्हायलाच हवं,” असं ते म्हणतात
सातारा शहर आणि उपनगरांच्या विकासाचा ध्यास त्यांनी घेतला आहे. शेती पर्यावरण उद्योग या मूळ गाभ्यातून साताऱ्याचा विकास करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. माहिती तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान आधुनिक शेती आणि साताऱ्याची औद्योगिक क्रांती त्यांना घडवायची आहे. त्यासाठीचे काम आणि पाठपुरावा त्यांनी सतत सुरू ठेवला आहे. लवकरच असे बदल घडत असल्याचे आपण सर्व अनुभवणार आहोत.
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास ते नेहमीच प्राधान्य देतात. यासाठी अनेकवेळा कठोर भूमिका घेतल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. लोकांच्या प्रश्नात आडव्या येणाऱ्या अपप्रवृत्तींना महाराज आपल्या पद्धतीने उत्तर देतात. प्रश्न समोर आल्यानंतर त्याची सोडवणूक होईपर्यंत ते गप्प बसत नाहीत. तर गोरगरीब जनतेच्या समस्या जाणून घेताना हा माणूस कमालीचा हळवा होतो. म्हणूनच लोकांच्या मनात त्यांच्याविषयी अपरंपार प्रेम,आदर, माया आणि सहानुभूती आहे.
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा, गोरगरीब जनतेसाठी राजेपद विसरून जाणारा, समाज कारणासाठी दिंड्या पताका हातात घेणारा, रस्त्यावरील मातीत फाटक्या कपड्यात मुलांमध्ये मिसळून जाणारा, हा राजा लोक कल्याणकारी आहे.ज्या वेळी कोणावरही अन्यायी घटना घडते तेव्हा जनतेच्या मुखातून एकच नाव येते ते म्हणजे फक्त उदयनराजे!

(शब्दांकन-विश्वास पवार)

Adv