Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City छ उदयनराजे यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा

छ उदयनराजे यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा

281
Adv

ज्ञान घेतल्याने वाढते. ज्ञानाची महती महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे ज्ञानमंदिर हे महत्त्वाचे मानून खासदार श्री. छ. उदयनराजे यांचे कट्टर समर्थक संग्राम बर्गे मित्र परिवाराने चिंचणेर वंदन येथील ज्ञान मंदिरास डागडुजी करता 51 हजाराचे अर्थसहाय्य करत खासदार उदयनराजे यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. चिंचनरवंदनची शाळा अत्याधुनिक आहेच परंतु त्या शाळेला इमारतीच्या डागडुजी करता संग्राम बर्गे मित्र परिवाराच्यावतीने यांनी मदतीचा हात देत वेगळा उपक्रम राबवला आहे.
चिंचणेर वंदन शाळेला 51 हजाराचा धनादेश देताना भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे, चिंचणेर वंदन चे सरपंच दीपक बर्गे, माजी सरपंच सुधाकर बर्गे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत फडतरे, तंटामुक्तिचे अध्यक्ष रामचंद्र वाघ, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह चिंचणेर वंदनचे अध्यक्ष मनोज बर्गे, आमदार महेश महेश दादा शिंदे युवा मंत्र चिंचणेर वंदनचे अध्यक्ष संदीप बर्गे, विकास सेवा सो. चिंचणेर वंदनचे संचालक अनिल बर्गे, सुनिल कदम व जि. प. शाळा चिंचनेर वंदनच्या मुख्यस्यापिका सौ. विद्या लोंढे, सह शिक्षका सौ. स्वाती मॅडम, सौ. साळुंखे मॅडम, सह शिक्षक मदने सर, ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.

Adv