सातारा ..प्रतिनिधी सातारा तालीम संघाचे पैलवान अमर श्रीरंग जाधव यांना विशेष एम पि आय डी सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे तब्बल सात महिन्यांनंतर कारागृहातून सुटका झाली आहे पंचवीस हजारांच्या जातमुचलक्यावर ही सुटका झाली आहे.
पैलवान अमर जाधव यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ७ महिन्यापूर्वी अटक केली होती शिवाजीराव भोसले बँकेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात बनावट चेक डिस्काउंट प्रकरणात जाधव यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता त्या दरम्यान न्यायालयाने जाधव यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती मात्र विशेष एम पि आय डी न्यायालयाने 85 मिनिटाची युक्तिवादानंतर अमर दादा जाधव यांची जामिनावर सुटका केली बचाव पक्षाच्या वतीने अँड सिद्धार्थ पाटील यांनी न्यायालयासमोर 85 मिनिटे युक्तिवाद केला या युक्तिवादा मध्ये जाधव यांच्यावर चेक डिस्काउंट प्रकरणात आर्थिक परताव्याची जबाबदारी निश्चित केली गेली होती त्याचा जाधव यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे पाटील यांनी सबळ पुराव्या द्वारे सिद्ध केले विशेष एम पि आय डी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी पी जाधव यांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करून अमर दादा जाधव यांचा जामीन मंजूर केला
मात्र या तपास कामांमध्ये सहकार्य करण्याचे बंधन त्यांना घालण्यात आले आहे शिवाजीराव भोसले बँक अवसायनात गेली असून चेक डिस्काउंट प्रकरणात बँकेचे 18 संचालक पोलिसांच्या ताब्यात आहेत अमरदादा साताऱ्यात दाखल झाल्याचे कळताच अमर दादा जाधव यांना भेटण्यासाठी त्यांच्या मित्रांनी भेटण्यासाठी गर्दी केली होती