पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभा उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. यामुळे विधानसभेचे अध्यक्षपद भाजपला तर उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आले आहे.
अण्णा बनसोडे यांचे उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर ते पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचे जागोजागे फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांचा हाराने सत्कार करण्यात आला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून एकदातरी पाहायचं आहे. ते मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्राची अपेक्षा आहे. ते लवकरच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास असल्याचे अण्णा बनसोडे यांना सांगितले. तसेच मला विश्वास होता की कुठलं ना कुठलं पद मिळेल. अखेर हे पद अजित पवारांनी मला दिलं आहे. मागासवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला अजित पवारांनी विधानसभा उपाध्यक्ष केले आहे. हे प्रामाणिक कामाचं फळ असल्याचे बनसोडे म्हणाले. तसेच महायुती म्हणून आम्ही काम करत आहोत. तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते जो निर्णय आगामी महापालिकेसाठी घेतील तो मान्य असल्याचे देखील त्यांनी सांगितले.