Monday, April 20, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे 437 कोटींचा निधी मंजूर-

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे 437 कोटींचा निधी मंजूर-

1489
Adv

नवी दिल्ली/
शिरवळ ते लोणंद आणि लोणंद ते सातारा असा एकूण सुमारे 72 किलोमिटर चार पदरी रस्त्याचे पेव्हड शोल्डर (पक्का खांदा) पध्दतीच्या, दोन भागामध्ये होणा-या सुमारे 437 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाकरीता एकूण 437 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्यावर या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ होणार आहे, नव्याने तयार होणा-या रस्त्यामुळे जलद आणि सुरक्षित आणि दर्जेदार वाहतुक सुविधा शिरवळ,लोणंद, वाठार, इत्यादी परिसराकरीता उपलब्ध होणार असून, गतीमान विकास साधण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये एक नवीन भर पडली आहे अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर आणी मार्गाच्या लगत सातारा जिल्हयातील बहुतांशी भाग जोडला गेला आहे. पुणे -बेंगलोर या महामार्गावरील प्रचंड वाहतुक असते त्यामुळे शिरवळ ते लोणंद आणि लोणंद ते सातारा या रस्त्यावरुन टोल वाचवण्यासाठी वाहनांची वर्दळ खुपच वाढली आहे. या रस्त्यावरुन केलेल्या निरिक्षणात दररोज शिरवळ लोणंद मार्गावर 9543 वाहने तर लोणंद सातारा मार्गावर 11,175 वाहनांची वाहतुक होत आहे. तसेच या पटयात पावसाळयात ब-यापैकी पर्जन्यमान असल्यामुळे शिरवळ-लोणंद आणि लोणंद सातारा या मार्गाची दर्जोन्नती करण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आहे. सततचा पाठपुरावा व असलेली वस्तुस्थिती याचा विचार करुन, केंद्रीय मंत्री .ना. श्री. नितिन गडकरी यांच्या रस्ते वाहतुक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे सुमारे 437 कोटी रुपयांच्या पेव्हड शोल्डर म्हणजेच फरसबंद खांदा पध्दतीच्या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे.
या शिरवळ ते लोणंद या रस्त्यावर 13 आणि लोणंद – सातारा दरम्यान 19 अश्या 32 पुलांची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे. तर एकूण 7 जंक्शन्स (रस्ते एकत्र येण्याचे ठिकाण ) नव्याने तयार करण्यात येणार आहेत. लोणंद- सातारा या मार्गावर 3 नवे पूल उभारण्यात येणार आहेत. तसेच शिरवळ ते सातारा व्हाया लोणंद या मार्गावर एकूण 131 कल्वहर्टस बांधण्यात येणार आहेत. रेल्वे किंवा रस्ता यांचे खालुन पाण्याचा पाट किंवा नळ, भुमीगत नाले इ. व्यवस्थेला कल्व्हर्टस असे संबोधण्यात येते
लोणंद-शिरवळ परिसरातील वाढे नागरीकीकरण आणि स्थिरावलेले औदयोगिकरण याचा विचार करता, महामार्ग आणि सातारा यांना जोडणारा हा रस्ता दर्जेदार असला पाहीजे या दूरदृष्टीकोनामधुन या रस्त्याबाबत आम्ही मांडणी केली होती. त्यासाठी पाठपुराव्यासह केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री ना.श्री.नितिन गडकरी यांना देखिल भेटलो होतो. आमच्या प्रयत्नांना ना.श्री. नितिन गडकरी यांच्या सकारात्म्क प्रतिसादामुळे आज या रस्त्याचे 437 कोटी रुपयांचे महत्वपूर्ण विकास काम मार्गी लागले आहे. याबाबतचे प्रत्यक्ष काम सुरु होवून, पूर्ण करण्याकडे आमचे प्रयत्न सातत्याने राहणार आहेत असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

Adv