निलेश मोरे यांची रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदासाठी शिफारस

362
Adv

साताऱ्याचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून साताऱ्यात शिंदे गटाच्या पुनर्बांधणी ला पुन्हा सुरुवात झाली आहे त्यामुळे शिंदे यांचे साताऱ्यातील कट्टर समर्थक निलेश मोरे यांची रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदासाठी शिफारस करण्यात आली आहे याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी या संदर्भातील हालचाली मात्र गतिमान झाल्या आहेत या वाटचालीवरून शिंदे गटाने साताऱ्यात पुनर्बांधणीचा नवा प्रयोग सुरू केल्याची चर्चा होत आहे

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरी ते शिवसेनेचे नाहीत अशी स्पष्टोक्ती शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली आहे मात्र शिंदे आपल्या समवेत 40 आमदार घेऊन भाजपच्या सोबत युती करून सत्ता स्थापनेत सहभागी झाले असून त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून नुकतीच शपथ घेतली त्यामुळे शिवसेनेचा खरा धनुष्यबाण कोणाच्या हाती असणार आहे हे बहुमत ठरावानंतर सिद्ध होणार आहे मात्र त्यापूर्वीच साताऱ्यात शिंदे यांनी आपल्या गट बांधणीचा प्रयोग सुरू केला असून तसे आदेशही कार्यकर्त्यांना रवाना झाले आहेत सातारा जिल्ह्यात संपूर्ण शिवसेना शिंदे समर्थक निलेश मोरे यांचा अपवाद वगळता शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे अभंग पण उभी राहिली आहे . सेना प्रमुखांनी एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या गटनेतेपदावरून पायउतार केले आहे . कारवाईचा तसा वरवंटा साताऱ्यातही फिरणार हे नक्की

शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भात पुणे येथे बैठकांचे आयोजित केले असून पश्चिम महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने मतदारांच्या याद्या आणि प्रभाग रचना निहाय मतदान केंद्र संख्या याची यादी मागवण्यात आली आहे तत्पूर्वीत शिंदे गटाने कारवाईचा विषय मागे ठेऊन गटबांधणीची पावले टाकायला सुरुवात केली असून निलेश मोरे यांना राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदासाठी शिफारस करण्यात आली आहे निलेश मोरे हे शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून सक्रिय असताना सातारा नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक पाच मधून त्यांनी शिवसेनेची बांधणी सुरू केली होती दरम्यान राज्यात सत्तापालट झाल्याने उद्धवसेना आणि शिंदे सेना असे दोन सरळ सरळ गट पडल्याने शिवसैनिकांमध्ये चलबिचल आहे निलेश मोरे यांनी एकनाथ शिंदे हेच माझे खरे देव असल्याचे सांगत शिंदे यांची साथ शेवटपर्यंत सोडली नाही आता शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची अचानक माळ पडल्याने साताऱ्यात निलेश मोरे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये अनेकांची गर्दी वाढू लागली आहे हस्ते पर हस्ते शिवसेनेतल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मोरे यांच्या सहकाऱ्यांनी आणि शुभचिंतकांनी त्यांची रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदासाठी शिफारस झाल्याने अभिनंदन करायला सुरुवात केली आहे

त्यामुळे सातारा जिल्ह्यातील शिवसेना नक्की उद्धवसेनेच्या गटात की शिंदे यांच्या गटात याविषयी सुद्धा वेगवेगळ्या चर्चा होतच आहेत मात्र निलेश मोरे यांनी खरी शिवसेना कोणती या विषयावर बोलायला स्पष्टपणे नकार दिला आहे माझे राजकीय गुरू एकनाथ शिंदे असून त्यांचा आदेश माझ्यासाठी अंतिम असेल असाच त्यांनी ठेका लावला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिंदे गट सक्रिय राहणारा असून राजकीय चाचणी त्या पद्धतीने सुरू करण्यात आली आहे विश्वासू आणि निष्ठावान चेहरे शिंदे गटाकडून शोधले जात असून त्याची यादी लवकरच मुख्यमंत्र्यांचे कामकाज सांभाळणाऱ्या कोर विभागाला सादर केली जाईल असे निलेश मोरे यांनी बोलताना सांगितले

Adv