राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दादांच्या गळाला

156
Adv

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना जिल्ह्यातच दणका?बसला आहे असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे

मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज सुनील माने यांनी भेट घेऊन पक्षप्रवेशाची तारीख निश्चित केली असल्याचे समजते?

काही दिवसांपूर्वी औंध येथे उपमुख्यमंत्री अजित दादा यांची सुनील माने यांनी कामासंदर्भात भेट घेतली होती तेव्हाच सुनील माने यांची पावले राष्ट्रवादीच्या घडाळ्याकडे वळली असल्याची चर्चा रंगली होती

शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने हे येत्या रविवारी मुंबई ते उपमुख्यमंत्री अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे त्यामुळे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना जिल्ह्यातच दणका बसला आहे

दिवसेंदिवस शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची ताकद जिल्ह्यात कमी होत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी ताकद वाढत असल्याचे चित्र आहे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना आता जिल्हाध्यक्ष सोडून चालल्याने मोठा धक्का मानला जात आहे

Adv