प्रदेशाध्यक्ष बावनकुळे माढा लोकसभा प्रवासावर

180
Adv

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी‘महाविजय 2024’लोकसभा प्रवासात मंगळवार,दि.26 डिसेंबर 2023 रोजी माढा लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.परंतु प्रदेशाध्यक्ष यांच्या दौऱ्या अगोदरच माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा फोटो मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून डावला गेल्याने एक प्रकारे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये ठिणगी निर्माण झाली आहे

माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेसाठी शड्डू ठोकला असून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व मोहिते पाटील यांच्यामध्ये दरार निर्माण झाली आहे मोहिते पाटील यांच्या व काही आमदारांच्या सहकार्याने रणजीतसिंह नाईक निंबाळकर माढा मतदारसंघाचे खासदार झाले असले तरी येणाऱ्या निवडणुकीत नक्की माड्याचा खासदार कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोचली असून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्या अगोदरच माढा मतदारसंघातील भाजपमध्ये दोन गट झाले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे

अकलूज येथील प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे कार्यक्रम
👇
सायं. 04.30 वा. अकलूज (जि. सोलापूर) येथील कृष्णप्रिया हॉल येथे करमाळा,माढा,सांगोला व माळशिरस या विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.यासोबतच ते काही प्रतिष्ठित नागरिकांच्या स्नेह भेटी घेणार आहेत व भाजपा संघटनात्मक बैठकीत सहभागी होतील.

Adv