दिनांक 14 रोजी साताऱ्यात महायुतीचा मेळावा

813
Adv

साताऱ्यातील गांधी मैदानावर दिनांक 14 /1/24 रोजी महायुतीचा मेळावा होणार असून याबाबत महायुतीची आढावा बैठक सातारा येथील शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते

लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागांचे उद्दिष्ट ठेवून आयोजित करण्यात आलेला हा मेळावा निश्चितपणे यशस्वी ठरले असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी बैठकीत व्यक्त केला असून या मेळाव्याचे केंद्रबिंदू असणार ते खा छ उदयनराजे भोसले,श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे, राजवाडा येथील गांधी मैदानावर सायंकाळी पाच वाजता महायुतीचा मेळावा होणार असून एक प्रकारे लोकसभेचे रणशिंगच या मेळाव्यातून फुकले जाणार हे मात्र नक्की

येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचे राज्यात मेळावे होत असून तशाच प्रकारचा मेळावा सातारा जिल्ह्यात साताऱ्यातील गांधी मैदानावर होणारा असून या मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

Adv