जयकुमार गोरे यांनी ताकद दाखवून केली लोकसभा व विधानसभेचे तयारी सुरू

347
Adv

येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त आमदार जयकुमार गोरे यांनी आपली ताकद दाखवून सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला नसून सातारा जिल्हा हा भाजपमय झाला असल्याचे कालच्या मेळाव्यातून दाखवून दिले एक प्रकारे आपली ताकद दाखवून आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा,माढासह सातारा जिल्ह्यातील विधानसभेची पेरणी सुरू केली असल्याचे दिसून येते

पश्चिम महाराष्ट्रा मध्ये सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून कायम अग्रेसर राहिला आहे त्याच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काल भाजपचे वरिष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातारा जिल्हा दौऱ्यावर होते या दौऱ्या दरम्यान आमदार जयकुमार गोरे यांनी एक प्रकारे भाजपची ताकद दाखवण्याचे काम देवेंद्र फडणीस यांच्यासमोर केले त्यामध्ये ते कितपत यशस्वी ठरणार हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल मात्र माढा मतदारसंघ व माण खटाव तालुक्यामध्ये स्वतःची ताकद दाखवण्यात आमदार गोरे हे यशस्वी झाले असल्याचे कालच्या गर्दीवरून स्पष्ट होते

येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार जयकुमार गोरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसून येते आमदार जयकुमार गोरे यांच्या रुपाने सातारा जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले तर भाजपची ताकद वाढण्यात नक्की मदत होईल काल झालेल्या मेळाव्यामध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी सर्व प्रकारची ताकद लावून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा यशस्वीरित्या पार पाडला याची पोचपावती म्हणून आमदार जयकुमार गोरे यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता असून सर्वांचे डोळे आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहेत

Adv