विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या तीन इसमांना करवडी येथे अटक

34
Adv

कराड शामगाव रस्त्यावर करवडी गावाच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या तीन इसमांना जेरबंद केले . दिनांक 19 रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे देशी बनावटीच्या पिस्टल,जिवंत काडतुसासह दोन मोबाईल हँडसेट व कार असा आठ लाख 51 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

कार्तिक अनिल चंदवानी व 19 राहणार लाहोटी नगर मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा,रुपेश धर्मेंद्र माने वय 22 राहणार कृष्णा अंगण बंगलो नंबर थ्री वाखाण रोड कराड तालुका कराड जिल्हा सातारा ,
अक्षय प्रकाश सहजराव वय 28 राहणार लाहोटी नगर मलकापूर तालुका कराड अशी तिघांची नावे आहेत .

या कारवाई बद्दलची अधिक माहिती अशी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना करवडी गावाच्या हद्दीमध्ये तीनं इसम देशी बनावटीच्या पिस्टल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, विश्वास शिंगाडे, कराड तालुका पोलीस स्टेशनचे संभाजी चौधरी, आतिश घाडगे, विजय कांबळे, शरद बेबले या पथकाने शामगाव कराड या रस्त्यावरील करवडी गावाच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग सुरू केले .रविवारी दुपारी बातमीदाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार ब्रिजा नावाची गाडी करवडी गावाच्या दिशेने येत होती त्यावेळी पोलीस पथकाने गाडी अडवून संबंधितांची झडती घेतली यामध्ये तीन देशी बनावटीच्या पिस्टल तीन जिवंत काडतुसे असे दोन मोबाईल हँडसेट आणि ब्रिजा कार असा साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 25(3) प्रमाणे कराड तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे .

Adv