संग्राम बर्गे यांची चोरीला गेलेल्या गाडीचे हैद्राबाद कनेक्शन उघड

363
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

सातारा : विलासपुर येथून शुक्रवार मध्यरात्री खा.उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय युवा नेते संग्राम बर्गे यांची ईनोवा क्रिस्टा चोरट्यांनी पळवून नेली. या घटनेने सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. चोरीची संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैदी झाली. हा प्रकार लक्षात येताच बर्गे यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली व शहर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदवली. सातारा पोलिसांनी ही घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या घटनेच्या शुक्रवार दिवसभर बातम्या व सोशल मीडियावर पोस्ट फिरत होत्या.

या घटनेची माहिती पुणे पोलिसांनाही देण्यात आली व पुणे ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी देखील आपला तपास त्या दिशेने सुरू ठेवला. या घटनेमागे आंतरराज्य टोळीचा हात असल्याचा त्यांच्या निदर्शनास आले यामध्ये रांजणगाव पोलीस ठाणे व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने मोहीम राबवली. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार चोरीचे कनेक्शन हैदराबाद असल्याचे निदर्शनास आले व पथकाने थेट हैदराबाद गाठले. तेथून वाहनांसह तीन आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये आंध्र प्रदेश मधील एक आरोपी तर उत्तर प्रदेश मधील दोन आरोपी असा आंतरराज्य चोट्यांचा समावेश आहे.

या आरोपींना रांजणगाव पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पुणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी संग्राम बर्गे यांना चोरीला गेलेले वाहन सापडले असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला वाहन सुपूर्त करण्यात येईल असे सांगितले. हे एकताच बर्गे कुटुंबीयांनी सुटकेचा विश्वास सोडला. अवघ्या बारा तासातच या चोरीचा छडा लावल्याने रांजणगाव पोलीस, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, हैदराबाद पोलीस व सातारा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. व बर्गे कुटुंबीयांनी देखील संपूर्ण पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहे.

Adv