अष्ट हजेरी ५ शिखर सर करणारी पाहिली भारतीय महिला ठरली प्रियंका मोहिते

292
Adv

सातारा : साता-याची गिर्याराेहक प्रियांका मंगेश मोहिते हिने ( कंजनजंगा पर्वत सर केला. प्रियांकाची हिची मोहीम यशस्वी झाल्याने साता-यात क्रीडाप्रेमींनी फटाके फाेडून आनंद व्यक्त केला.

प्रियांकाने ही माेहिम आज सायंकाळी चार वाजून ५२ मिनीटांनी पुर्ण केल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली. तिने बेस कॅम्पवर उतरण्यास प्रारंभ केला आहे आणि ती लवकरच भारतात (india) परतेल असा विश्वास तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केला

प्रियांका अन्नपूर्णा शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली होती. आता कंचनजंगा पर्वतावरील यशानंतर ती आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची पाच शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे असे दावा तिच्या कुटुंबियांनी केला

Adv