Tuesday, August 25, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District अजितदादांच्या स्मरणार्थ कुसवडे येथे शालेय साहित्य वाटप

अजितदादांच्या स्मरणार्थ कुसवडे येथे शालेय साहित्य वाटप

52
Adv

सातारा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ सातारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजिंक्य सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे कुसवडे, ता. जि. सातारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात सातारा जिल्ह्याचे राज्यसभा खासदार नितीन पाटील (काका) यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सातारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदिप चव्हाण, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन जाधव, ज्येष्ठ नेते सूर्यकांत बर्गे (काका), सातारा पंचायत समिती सदस्य राहुल कापले, कुसवडेचे सरपंच राहुल गुरव, आयोजक स्वप्निल भोसले, गजानन जाधव, शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे, हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देणारा ठरला. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

Adv