Sunday, September 20, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा सातारा जिल्हा दौऱ्यावर

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा सातारा जिल्हा दौऱ्यावर

440
Adv

सातारा : मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध प्रश्नांवर मराठा बांधवांशी थेट संवाद साधण्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे 11 व 12 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मायणी, मसूर, पाटण आणि सातारा येथे संवाद बैठका आयोजित करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील मराठा समाजात या दौऱ्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दौऱ्याची सुरुवात 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मायणी (ता. खटाव) येथील संवाद बैठकीने होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजता मसूर (ता. कराड) येथे दुसरी बैठक पार पडणार आहे. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पाटण येथे संवाद बैठक होणार असून, दुपारी 2 वाजता राजधानी सातारा येथे सांगता मेळावा आणि महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर भूमिका मांडणार असून, आगामी आंदोलनाची दिशा, संघटनात्मक बांधणी आणि समाजाच्या पुढील वाटचालीबाबतही मार्गदर्शन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दौऱ्यानिमित्त जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Adv