राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आज पंढरपूर–माळशिरस–नातेपुते–बरड–तरडगाव–लोणंद–नीरा नदी–सासवड या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील रस्त्यांची स्थिती, वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधा, तसेच सुरू असलेल्या आणि प्रलंबित विकासकामांचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह मंत्री गोरे विविध ठिकाणी भेटी देऊन आवश्यक त्या सूचना देणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पालखी मार्गावरील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुकर आणि सुविधायुक्त व्हावा, यासाठी ही पाहणी महत्त्वाची मानली जात आहे.






