Sunday, July 5, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District राजमाता कल्पनाराजे भोसले यांची गोपीनाथ गडावर भावपूर्ण भेट

राजमाता कल्पनाराजे भोसले यांची गोपीनाथ गडावर भावपूर्ण भेट

144
Adv

भाजप खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी बीड येथील गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेत त्यांना विनम्र अभिवादन केले.

गोपीनाथराव मुंडे साहेबांचे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर पुत्रवत प्रेम होते राजमातांच्या या भेटीमुळे भोसले घराणे आणि मुंडे परिवारातील जिव्हाळ्याचे,स्नेहपूर्ण आणि कौटुंबिक संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले असल्याची प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली

दौऱ्यानिमित्त मी नवी दिल्लीत असल्याने, राजमातांशी मोबाईलवरून संवाद साधला असल्याचे ही पंकजा मुंडे यांनी सांगितले असून गोपीनाथ गडावर आगमन होताच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजमाता कल्पनाराजे भोसले यांचे अत्यंत आदरपूर्वक स्वागत केले.

Adv