Wednesday, June 17, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District किसन वीर व खंडाळ्याची एफआरपीची संपर्ण रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग

किसन वीर व खंडाळ्याची एफआरपीची संपर्ण रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग

14
Adv

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व किसन वीर-खंडाळा साखर उद्योग या कारखान्यांकडे सन २०२५-२६ मध्ये गळितासाठी आलेल्या अनक्रमे ४ लाख ५३ हजार ६५६ मे. टन व २ लाख ४५ हजार २८० मे. टनाची ३३५० रूपयांप्रमाणे होणारी एफआरपीची संपुर्ण रक्कम रूपये २३४ कोटी १४ लाख ३८ हजार ५३४ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केलेली आहे. कारखान्याने यापुर्वीच १५ जानेवारीअखेर गळितास आलेल्या ऊसाची संपुर्ण एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना आदा केलेली होती. आता दि. १६ जानेवारी ते ७ फेब्रवारीअखेर गळितासाठी आलेल्या ऊसाच्या बीलाची रक्कम २५ कोटी ९४लाख ८५ हजार ५७१ रूपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे. त्यामळे उत्पादक सभासद व शेतकरी आणि कार्यक्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्याचे सभासद त्याचप्रमाणे ऊस उत्पादक शेतकरी यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील यांच्यावर ज्या विश्वासाने कारखान्याची धुरा दिलेली होती, तो विश्वास सार्थ ठरविल्याचा अभिमान व्यवस्थापनास असल्याचे प्रतिपादन, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, मागील चार सिझनमध्ये कोणत्याही बँकेचे वित्तसहाय्य न घेता तसेच आतापर्यत कोणत्याही शेतकऱ्यांचा एक रूपायाही न बुडवता कारखान्याने शेतकऱ्यांचे संपुर्ण बील दिलेले आहे. कारखान्याकडुन अवांतर व इतर कोणत्याही प्रकारे अवाजवी खर्च केला जात नसून नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत प्रामाणिकपणे व पारदर्शकरित्या कारखान्याचा कारभार सुरू आहे. कारखान्याने मागील चारही वर्षात एफआरपीची संपुर्ण रक्कम दिलेली असून सन २०२०-२१ मधील थकीत ६४ कोटीची ऊस बीलेही दिलेली असल्यामळे सभासद व शेतकऱ्यांमध्ये कारखान्याप्रती विश्वास दृढ झालेला आहे. मागील सिझनमध्ये किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने पुर्ण क्षमतेने सुरू होते. सन २०२६-२७ या गळित हंगामाची तयारीही सुरू असून येणारा सिझनही पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

तसेच काही लोकांकडून कारखान्याविषयी जाणिवपुर्वक बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू असून, यामध्ये काहीही तथ्य नसून तशाप्रकारचे कोणतेच प्रकार कारखान्यामध्ये होत नाहीत. कारखान्याच्या समजुतदार व जबाबदार शेतकरी वर्गाने अशा कलुषीत माणसांच्या कटकारस्थानाला बळी पडू नये, तसेच येणारा गळित हंगाम २०२६-२७ मध्ये आपला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यास घालण्याचे आवाहनही संचालक मंडळाच्यावतीने व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे व कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी केले आहे

Adv