Monday, June 15, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या नगरसेवकांची ‘ट्रिप’!?

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या नगरसेवकांची ‘ट्रिप’!?

79
Adv

सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून सातारा पालिकेतील नगरसेवकांना दोन दिवसांच्या सहलीसाठी रवाना करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी ९ वाजता शेंद्रे येथून नगरसेवकांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आल्याची चर्चा आहे.? ही सहल अलिबागच्या दिशेने रवाना होणार असल्याचेही बोलले जात आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून आपल्या नगरसेवकांची एकजूट कायम ठेवण्यासाठी आणि फोडाफोडीच्या राजकारणाला आळा घालण्यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, काही नगरसेवकांनी या सहलीला जाण्यास नकार दिल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे या ‘राजकीय ट्रिप’मुळे सातारा जिल्ह्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
नगरसेवकांची ही सहल केवळ विश्रांतीसाठी आहे की विधानपरिषद निवडणुकीतील राजकीय रणनीतीचा भाग, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Adv