Monday, September 21, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत

सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत

132
Adv

सातारा जिल्ह्यात शिवसेना पक्षात असंतोषाचा भडका उडाला असून जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या पाठोपाठ दुसरे जिल्हाप्रमुख रणजीत सिंह भोसले यांनीही नाराजीचा बार उडवून दिला आहे.,, पक्षात लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत असे शीतयुद्ध सुरू असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.,
जिल्ह्यात पदाधिकारी नियुक्तीसाठी इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर झाल्याने पक्षातील खदखद चव्हाट्यावर आली आहे. काल पक्षात आलेल्यांनी तीस – तीस वर्ष पक्षासाठी खस्ता खाल्लेल्यांच्या मुलाखती घ्यायच्या का ? असा सवाल करत जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी गुरुवारी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यापाठोपाठ सातारा व वाई विधानसभा मतदारसंघां चे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनीही नाराजीचा बार उडवत चंद्रकांत जाधव यांच्या भूमिकेचे एकप्रकारे समर्थनच केले आहे.,,
पक्षात लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत असे शीतयुद्ध सुरू असून ही टोळी त्यांच्या समर्थकांची टोळी तयार करून निष्ठावंतांच्या अंगावर घालण्याचे उद्योग करत आहे. निष्ठावंतांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. पक्ष विरहित स्वतःला महत्व प्राप्त व्हावे जिल्हात मला मानणारे कार्यकर्ते पदाधिकारी असावेत त्यां साठी नको त्या व्यक्तींना ताकत दिली जाते, हा पक्षाला घातक असणारा विषय आहे ,,पक्षाचे पळणारे पदाधिकारी यांना त्रास देऊन आर्थिक लाभार्थी पक्षावर ताबा घेत आहेत ,, अशी कैफियत भोसले यांनी मांडली आहे.
शिवसेनेत नियुक्त्या आदेशाने होतात,,
शिवसेनेत नियुक्त्या मुलाखतींनी होत नाहीत. आदेशाने होतात. मुलाखतींचे नाटक उभे करून येथे काँग्रेस संस्कृतीचे अनुकरण करत आहे अशी खरमरीत टीका त्यांनी केली. पक्षाच्या मुख्य नेत्यांनी अशा वरिष्ठ नेतृत्वा पासून जिल्हातील निष्ठावंत शिवसैनिकांना वाचवावे असे जिल्हातील सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे,, हीच व्यथा सातारा जिल्ह्याचे तिसरे जिल्हाप्रमुख आदरणीय जयवंतराव शेलार माऊली यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख आदरणीय दगडू दादा सपकाळ यांच्यासमोर मांडली होती व तसेच माननीय उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ही खदखद स्वतः माऊली शेलार यांनी मांडली होती,, ही अदृश्य खदखद येत्या काळात होणाऱ्या पदाधिकारी बैठकीत बाहेर पडेल त्यां वेळी त्यांच्या बाबतीत काय करायचे ते पक्षाने ठरवावे अशी निर्वाणीची भाषा भोसले यांनी केली आहे.,,

Adv