Wednesday, October 14, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District युवक प्रदेशाध्यक्षांना साताऱ्याचे वावडे का?

युवक प्रदेशाध्यक्षांना साताऱ्याचे वावडे का?

219
Adv

भारतीय जनता पार्टी खासदार पुत्र व युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आपला पश्चिम महाराष्ट्राचा दौरा जाहीर केला असून या दौऱ्यातून साताऱ्याला वगळले असल्याचे दिसून येते त्यामुळे कृष्णराज महाडिक यांना साताऱ्याचे वावडे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे

युवक मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतरही कृष्णराज महाडिक साताऱ्याला आलेच नाहीत पुणे कोल्हापूर वरून साताऱ्याला ते बराच वेळा गेले मात्र त्यांना साताऱ्याचे वावडे असल्याचे बोलले जात आहे कोल्हापूर सातारा हे अंतर अवघ्या दोन तासाचे असून त्यांनी आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यातुन साताऱ्याला वगळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे

सातारा हा आता भाजपचा बालेकिल्ला असून तो पश्चिम महाराष्ट्रातच मोडतो मात्र जाणून बुजून साताऱ्याला डावलले की अन्य काही राजकारण हे येणाऱ्या काही दिवसा स्पष्ट होईलच मात्र पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यातून सातारा नाव वगळल्याने कृष्ण महाडिक यांच्यावर नाराजीचा सूर उमटत आहे

Adv