Wednesday, June 17, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City सातारा पालिकेत नामदार शंभुराज देसाईंचा फोटो

सातारा पालिकेत नामदार शंभुराज देसाईंचा फोटो

531
Adv

सातारा पालिका निवडणुकीत शिवसेनेचे एकमेव उमेदवार संकेत साठे हे शिवसेना चिन्हावर निवडून आले व पहिल्या टर्म मध्ये सभापती झाले त्यानंतर त्यांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले त्यांच्याबरोबर केबिनमध्ये नामदार पालकमंत्री शंभूराजे यांचा फोटो लावला

सातारा पालिकेवर दोन्ही राजेंचे वर्चस्व राहिले आहे या दोन नेत्यांचे व्यतिरिक्त कोणत्याही जिल्ह्यातील इतर नेत्याचा पालिकेमध्ये फोटो लावला गेला नाही मात्र पहिल्यांदाच शिवसेनेचे नगरसेवक म्हणून संकेत संजय साठे हे निवडून आले व तिकीट दिलेल्या नेत्याचा फोटो त्यांनी दिमाखात लावला

संकेत साठे यांच्या या कृतीने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले असून सातारा पालिकेचे राजकारण आता बदलले गेले असल्याचे दिसून येते

Adv