Saturday, April 11, 2026
spot_img
Home Maharashtra एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महिला जिल्हाप्रमुख मिळेना?

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महिला जिल्हाप्रमुख मिळेना?

92
Adv

तत्कालीन शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शारदा जाधव यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला व राष्ट्रवादी प्रवेश करून निवडणूक लढवली तेव्हापासून हे पद रिक्त असल्याने या पदावर नियुक्ती न केल्याने शिवसेनेला सातारा जिल्ह्यात महिला जिल्हाप्रमुख मिळेना अशीच अवस्था दिसून येते

सातारा जिल्हा क्रांतीकारांचा जिल्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही या जिल्ह्यातील मात्र त्यांच्या जिल्ह्यातील शिवसेनेला महिला जिल्हाप्रमुख मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे महिला संपर्कप्रमुख मात्र जिल्हा दौऱ्यावर आहेत मात्र पूर्णवेळ जिल्हाप्रमुख कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे

निष्ठावंत महिलेला शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख पदावर वर्णी लावावी अशीच अपेक्षा काही जुन्या जाणत्या शिवसैनिकांची असून नक्की सातारा जिल्ह्यातील शिवसेनेला महिला जिल्हाप्रमुख कधी मिळणार याकडे आता लक्ष लागले आहे

Adv