
चोरगे माळावर हायटेक स्किल सेंटर पाहणी दरम्यान भाजपच्या नगरसेविका व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समर्थक शारदा वाघमोडे यांनाच डावल्याने त्यांनी उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली
उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर हे खासदार गटाचे सध्या पालिकेचे प्रमुख असून ज्या चोरगे माळावर पाहणी केली त्याच प्रभागातील नगरसेविका असलेल्या शारदा वाघमोडे यांनाच डावल्याने नक्की पालिकेत चालले काय हाच प्रश्न उभा राहिला आहे
पार्टीतीलच व्यक्तींना डावलून पाहणी होत असेल तर हे दुर्दैवच म्हणावे लागेल महिला नगरसेविकांचा सन्मान तरी पालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी करणे गरजेचे असून या पाहणी दरम्यान नक्की राजकीय स्वार्थ तर कोणाचा नाही ना अशी चर्चा रंगू लागली आहे




