सातारा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या कार्यपध्दतीबाबत सातारा शहरात दबक्या आवाजात चर्चा होती. राजकीय वरदहस्त आणि वरिष्ठांशी लागेबांधे असल्यामुळे त्यांची बदली होऊनही त्यांना तात्काळ बदली करण्याबाबत सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पोलीस महासंचालक दाते यांच्याकडे तक्रार करुन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याचे तात्काळ दखल घेत पोलीस महासंचालक दाते यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना पो.नि. म्हस्के यांची ज्या ठिकाणी आधी बदली झाली त्याच ठिकाणी तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पो.नि. म्हस्के यांना कार्यमुक्त आदेश दिले म्हस्के त्यांच्या मूळतुरुची (जि.सांगली ) येथे बदली ठिकाणचे आदेश दिले.
याबाबत श्री. मोरे यांनी पोलीस महासंचालक दाते यांना दिलेल्या निवेदनात, सातारा शहरातील वाढती गुन्हेगारी, खून आणि परिस्थिती हाताळण्यात अकार्यक्षम ठरलेल्या सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांची सांगली येथे बदली होवूनही त्यांना मुक्त केले नसल्यामुळे त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी. सातारा शहर नगरपरिषदेच्या २०२५ च्या निवडणुकीवेळी असे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांची २७/५/२०२५ रोजी बदली आदेश होऊनही त्यांना राजकीय दबावापोटी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी अद्यापपर्यंत सोडले नस्लयाने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्याचे लाडके पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांची बदली सातारा जिल्हा ते मुंबई शहर पोलीस दलात एप्रिल २०२४ मध्येच झाली होती. परंतू राजकीय वरदहस्तामुळे लोकसभा २०२४, विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत अतिशय एकतर्फी काम करून त्यांना मदत केली. म्हणून त्यांची बदली मुंबई शहर ऐवजी पोलीस ट्रेनिंग सेंटर तुरची जि. सांगली येथे करून घेतली. ही बदली एप्रिल-मे २०२५ मध्ये पोलीस महासंचालकांच्या आदेशाने झाली होती परंतु सातारा नगरपरिषद निवडणूकीतही त्यांची मदत आवश्यक होती म्हणून त्यांनी सध्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सातारा यांच्यावर दवाव आणून बदलीवर मुक्त होवू दिले नाही. पूर्व बाजूच्या गुंडाणा पाठीशी घालणे, बेकायदेशीर व्यवसायाना मदत करणे,आता निवडणूकीत एकतर्फी काम करून सत्ताधा-यांना मदत करणे या गोष्टीची शहरात चर्चा आहे.
याकामी प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरल्यापासून मतदान दिवशीपर्यंत सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी कायदा व सुव्यवस्था आणि शांतता ठेवण्याकामी त्यांना अपयश आले आहे. त्यांच्या कार्यकाळात सातारा शहरात झालेले खून, हाफमर्डर, चोरी, घरफोडी इ. माहिती घेतली असता क्राईम रेट त्यांच्या कालावधीत खूप वाढला आहे. याकामी ठोस कारवाई होणे गरजेचे असताना पोलीस अधिक्षक श्री म्हस्के यांना का चार्ज सोडण्याससांगत नाहीत याची खात्री करण्याकामी योग्य त्या निवृत्त पोलीस अधिकारी अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी. तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून गोपनीय अहवाल मागवावा तसेच सीआयडी आणि एसआयटी विभागाकडून अहवाल मागवावा आणि निर्णय घ्याव, अशी मागणी केली होती. तसेच तात्काळ बदली न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल घेत पोलीस महासंचालक दाते यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना पोलीस निरीक्षक म्हस्के यांची तात्काळ बदलीच्या ठिकाणी रूज होण्याचे आदेश काढले आहेत.
कोट
पोलीस निरीक्षक म्हस्के यांनी नगरपालिका निवडणुक काळात एकतर्फी काम केले. पोलीस महासंचालकांनी तात्काळ आदेश दिल्याने कायदा हा सर्वांना समान असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करावे.
– सुशांत मोरे, सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते.






