जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करा म्हणणारे पालकमंत्री महोदय जिल्ह्यातील खासदारांच्या पत्राला दात देत नसून तीन पैकी एकाही खासदार महोदयांना जिल्हा नियोजनचा निधी एक वर्षापासून मिळाला नसल्याने? खासदार फक्त जिल्हा नियोजन समितीचे नामधारीच सदस्य का असे म्हणावे लागेल
जिल्हा परिषदेकडील विविध यंत्रणांना जिल्हा वार्षिक योजनेतून 60 टक्के निधी वितरीत करण्यात आला आहे. हा निधी तातडीने खर्च करावा असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेकडील विविध यंत्रणांना जिल्हा वार्षिक योजनेतून विकास कामांसाठी निधी देण्यात आला आहे. खर्चाचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेकडील विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजनेचा 60 टक्के वितरीत केलेला निधी खर्च झाल्याशिवाय उर्वरित निधी वितरीत केला जाणार नाही याची दक्षता घेऊन विकास कामे तात्काळ पूर्ण करावीत. अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांना निधी नसल्याचे सांगत आहे त्यामुळे ठेकेदार विकास कामांना वेळत लावत आहेत. त्यामुळे ठेकेदारांना निधीची माहिती द्यावी. निधी खर्चात महाराष्ट्रात सातारा जिल्हा अग्रेसर राहील यासाठी निधी वेळेत खर्च करावा.






