पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांसोबत महत्त्वाची बैठक घेऊन राज्यातील विकास कामे आणि परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. यावेळी साताऱ्याचे भाजपा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह महाराष्ट्रातील भाजप खासदार उपस्थित होते
खासदारांना आपापल्या मतदारसंघातील केंद्र सरकारच्या योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रावर काम करत संघटना बळकट करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश यावेळी देण्यात आले.
पंतप्रधान मोदीजींचे मार्गदर्शन आमच्यासाठी नेहमीच मोलाचे आणि प्रेरणादायी असते. त्यांच्या अविरत काम करण्याच्या जिद्दीतून आणि राष्ट्रभक्तीतून आम्हाला सतत नवी ऊर्जा मिळत असल्याचे काही खासदारांनी सांगितले







