सातारा शहरातील दोन जण दोन वर्षासाठी तडीपार

30
Adv

सातारा जिल्हयामधील सातारा शहर, शाहुपुरी परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे मालमत्ते विरुध्दचे गुन्हे
करणारे सराईत टोळीचा प्रमुख १) स्मितेश उर्फ सागर दिलीपउंबरकर वय २८ वर्षे, रा. मोळाचा ओढा सैदापूर ता.जि.सातारा. २) नरेश शेरसिंग सुनार वय- १९ वर्षे रा. सुरुची बंगल्या समोर शुक्रवारपेठ सातारा ता.जि.सातारा यांचे टोळीवर दरोडा टाकणे, जबरी चोरी, खंडणी मागणे, बेकायदेशिर जमाव जमवून मारामारी करणे, अवैद्य शस्त्राचा वापर करून लोकांवर कोयत्याने वार करणे, शस्त्रबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, दुखापत करणे तसेच शिवीगाळ दमदाटी करणे यांसारखे दखलपात्र व अदखलपात्र
स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने शाहुपुरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. एस जी म्हेत्रे, पोलिस निरीक्षक शाहुपुरी पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. राजीव नवले, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांनी केली होती.

शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर दरोडा टाकणे, जबरी चोरी, खंडणी मागणे, बेकायदेशिर जमाव जमवून मारामारी करणे, अवैद्य शस्त्राचा वापर करून लोकांवर कोयत्याने वार करणे, शस्त्रबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, दुखापत करणे तसेच शिवीगाळ दमदाटी करणे यांसारखे दखलपात्र व अदखलपात्र यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनसुध्दा त्यांनी आपल्या टोळीने गुन्हेगारी कारवाया चालुच ठेवल्या आहेत. त्यांच्या टोळीवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे सातारा तालुका परिसरातील लोकांना मोठया प्रमाणावर या
टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर कायदयाचा वचक राहवा याकरीता सर्वसामान्य जनतेतुन त्यांचेवर कडक
कारवाई करणेची मागणी होत होती. मा. तुषार दोशी, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर १) स्मितेश उर्फ सागर दिलीप उंबरकर वय-२८ वर्षे, रा. मोळाचा ओढा सैदापूर ता. जि. सातारा. २) नरेश शेरसिंग सुनार वय १९ वर्षे रा सुरुची बंगल्या समोर शुक्रवारपेठ सातारा ता. जि. सातारा यांची सुनावणी होवुन सदर टोळीस महाराष्ट्र
पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपुर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे

Adv