महाराष्ट्रातील समस्त साहित्यिक बिरादरीला माहीत आहेच की गेल्या काही दिवसात झालेल्या भयावह अतिवृष्टीमुळे आपल्या शेतकरी बंधू-भगिनींच्या शेतीचे आणि गुरेढोरे व संसाराचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांचा आक्रोश हेलावून टाकणारा आहे. ‘ आभाळ फाटले, ठिगळं तरी किती लावणार !’ असं म्हणून चालणार नाही. लिहित्या संवेदनशील हातांनी आपल्या या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यथाशक्ती मदत केली पाहिजे, असा विचार करून ९९ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी ₹१०००००/ (रुपये एक लाख) मुख्यमंत्री निधीकडे रवाना केले आहेत. आम्ही खाली नावे असणारे साहित्यकार आमच्या समस्त लेखन बिरादरीला आवाहन करीत आहोत की आपणही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यथाशक्ती मदत मुख्यमंत्री निधीला आजच पाठवून देऊया. आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींनाही तसे करायला सांगूया. जय हिंद! जय महाराष्ट्र!
https:/cmrf.maharashtra.gov.in. या वेबसाईटवर जाऊन Online Donation हा पर्याय निवडा.
आपले नम्र,
विश्वास पाटील,भारत सासणे, अर्जुन डांगळे, प्रेमानंद गज्वी, अशोक नायगावकर, डॉ.महेश केळुसकर, विनोद कुलकर्णी ॲडव्होकेट राजेंद्र पै, डॉ . सुलभा कोरे, अभिराम भडकमकर, श्रीकांत बोजेवार ,मुरलीधर नाले, अशोक मुळे, अशोक