किसन वीर’चा भारतीय शुगरकडुन सन्मान

12
Adv

कोल्हापूर येथे भारतीय शुगरच्या वार्षिक मिटींगमध्ये किसन वीर सांतारा सहकारी साखर कारखान्यास यावर्षीचा ‘बेस्ट रिकन्ट्रक्शन ऑफ सिक युनिट फॉर शुगर मिल’ हा मानाचा पुरस्कार राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, सीईओ संग्रामसिंह शिंदे व विश्वस्त रणवीरसिंह शिंदे यांच्या उपस्थितीत किसन वीर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, उत्तमराव पाटील यांनी कोल्हापुर येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात स्विकारला.

प्रमोद शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने मागील तीन वर्षामध्ये अतिशय काटकसरीने व आर्थिक विवंचना असतानादेखील शेतकरी व कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले. इतर कारखान्यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या ऊसाला दर देऊन त्यांना व कर्मचाऱ्यांना न्याय दिला. शासनाकडून मिळालेल्या अर्थसहाय्याचा विनियोग योग्य पद्धतीने किसन वीर व खंडाळा या कारखान्यांची देणी देण्यासाठी व सक्षम करण्यासाठी व्यवस्थापनाने केलेल्या जाणीवपुर्वक प्रयत्नांची दखल घेत भारतीय शुगरने ‘बेस्ट रिकन्ट्रक्शन ऑफ सिक युनिट फॉर शुगर मिल’ या पुरस्कारासाठी निवड केलेली होती. शेतकऱ्यांच्या पाठींब्यावर येणान्या सिझनमध्ये किसन वीरने ८ लाख तर खंडाळा कारखान्याने ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवलेले आहे. शेतकऱ्यांकडूनही यावर्षीसाठी ऊस नोंदीचे प्रमाण वाढलेले दिसून येते आहे. भारतीय शुगरने किसन वीरला सन्मानित केल्यामुळे कारखाना व्यवस्थापन, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढलेले आहे. त्यामुळे येणारा गळीत हंगाम आमच्या किसन वीर व खंडाळा कारखान्यासाठी अतिशय समाधानी व आर्थिक स्थैर्य प्राप्त करणारा ठरणार असल्याची ग्वाहीही यावेळी प्रमोद शिंदे यांनी दिली.

पुरस्कार प्रदान समारंभावेळी कारखान्याचे संचालक सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, ललित मुळीक, संजय फाळके, संजय कांबळे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे , खंडाळा कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, कारखान्याचे चिफ अकोंटंट आर. जी. उन्हाळे, चिफ इंजिनिअर एस. जी. सुर्यवंशी, चिफ केमिस्ट, व्ही. एम. गाढवे, डिस्टीलरी मॅनेजर उदयसिंह भोसले, परचेस ऑफिसर संतोष जगताप आदी उपस्थित होते.

Adv