कराड उत्तर चे भाजप आमदार मनोज घोरपडे हे आपल्या कुटुंबासमवेत आज विधानभवनात पाहायला मिळाले
कराड उत्तरचे भाजप आमदार मनोज घोरपडे हे आज आपल्या पत्नी व मुलांसमवेत मुंबई येथे चालू असलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान विधानभवनात उपस्थतीत होते विधानसभा व विधान परिषदेचे कामकाज कसे चालते याची उत्सुकता त्यांच्या कुटुंबांना होती हे कामकाज व विधान भवन पाहण्यासाठी आज आम्ही सहकुटुंब विधानभवनात दाखल झालो असल्याची प्रतिक्रिया आमदार मनोज घोरपडे यांनी सातारानामाशी बोलताना दिली
टीव्हीवर च आज पर्यंत विधानभवन व विधान परिषदेचे कामकाम चालू असताना कुटुंबाने अनेकदा पाहिले आहे प्रत्यक्षात विधान भवन कसे आहे? विधानसभेच्या कामकाजाची पद्धत कशी चालते हे आज आमदार घोरपडे यांच्या कुटुंबीयांनी समक्ष पाहिले