Monday, May 25, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City जगतापवाडी येथील निकृष्ट कामाचा ठेकेदाराला दणका

जगतापवाडी येथील निकृष्ट कामाचा ठेकेदाराला दणका

347
Adv

गोडोली परिसरातील पेरेंट हायस्कूल ते रामराव पवार नगर यादरम्यानचे पंधराशे मीटर लांबीचे गटार बांधकाम निकृष्ट पद्धतीचे केल्यामुळे सातारा पालिकेने संबंधित ठेकेदाराला दणका दिला आहे . या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात येऊन त्याची 16 लाख 74 हजार रुपये त्याची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे

संबंधित ठेकेदाराला काळ्या यादी टाकण्यात आल्याचे पालिका सूत्रांनी कळवले आहे .याबाबत अधिक माहिती अशी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत रामराव पवार नगर ते पेरेंट्स हायस्कूल यादरम्यान पंधराशे मीटर लांबीचे रस्त्याच्या कडेला गटार संरक्षण भिंत बांधण्याचे काम ठेकेदार कुणाल तात्यासाहेब गायकवाड यांना उणे १८ .१८ टक्के दराने देण्यात आले होते . इतक्या कमी दरात कामाचा दर्जा दाखला जाणार का? या पालिकेच्या सवालावर ठेकेदाराने उत्कृष्ट कामाची हमी दिली होती . हे काम तब्बल एक कोटी 38 लाख 86 हजार 408 रुपयांचे होते .ठेकेदाराने या बांधकामांमध्ये 540 मीटरच्या आरसीसी बांधकाम पूर्ण केले मात्र हे काम अत्यंत धीम्या गतीने होते त्यानंतरच्या कामांमध्ये काही ठराविक प्रमाणात सहा मीटर व्यासाचे स्टील बार वापरण्यात आले होते मात्र त्याला कव्हरिंग देण्यात आले नव्हते . त्यामुळेच या कामावर शंका घेऊन पालिकेने या कामाला नोटीस बजावली मात्र तरी त्यांनी त्या कामात सुधारणा केली नाही .त्यामुळे सतरा फेब्रुवारी 2025 रोजी पालिकेने कार्यादेश काढून गायकवाड यांचे काम रद्द केले तसेच त्यांची बयाना व सुरक्षा रक्कम 16 लाख 74 हजार 500रुपये जप्त करण्यात आली तसेच कुणाल गायकवाड यांना पालिकेच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे .

कुणाल गायकवाड यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा कामासाठी रोहित जाधव यांचा भाडेकरार सादर केला होता .रोहित जाधव यांनी 31 डिसेंबर २०२४ रोजी तक्रार अर्ज देऊन गायकवाड यांनी यांनी विजय संदर्भातील जोडलेली कागदपत्रे आणि मशिनरी बाबतची माहिती चुकीची असल्याची कळवले होते याबाबत ठेकेदार गायकवाड यांनी कोणताही पालिका कार्यालयाला खुलासा केला नाही यामुळेच गायकवाड यांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली असून त्यांना ब्लॅकलिस्टेड करण्यात आले आहे याबाबतची माहिती सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी कळवलेले आहे

Adv