राज्यात आज पावसाची शक्यता

160
Adv

गुढीपाडव्याला रविवारी (दि. 30) मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे. त्याच दिवशी राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होत आहे. 30 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत राज्यातील सर्वच भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात 1 आणि 2 एप्रिल रोजी बहुतांश भागात गारपीट होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

वायव्य भारतात जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली असून, त्यांचा वेग ताशी 30 ते 40 कि.मी. इतका आहे. तसेच, या कालावधीत वायव्य भारतात कमाल तापमानातही 4 ते 6 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि पूर्वोत्तर भारतासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, रायलसीमा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, आंध्र प्रदेश या राज्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस अन् गारपीट होण्याची शक्यता आहे.

असे आहेत येलो अलर्ट (कंसात तारखा : 30 मार्च ते 2 एप्रिल)

पालघर (31), ठाणे ( 31, 1), रायगड (1), सिंधुदुर्ग (29), धुळे (31), नंदुरबार (31), जळगाव (1), नाशिक (31, 1), अहिल्यानगर (31, 1), पुणे (1), कोल्हापूर (29, 30), सातारा (29), सांगली (29, 30), छ. संभाजीनगर (1), बीड (1).

Adv