सातारा जिल्हयातील पालकमंत्री पदाचे बाबतीत राज्य शासनाचा कस लागणार

609
Adv

राज्याचे मुख्यमंत्री ना.देर्वेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना.अजितदादापवार या महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी दिर्घचर्चा आणि विचारविमर्श करुन,राज्यातील पालक मंत्रीपदाबाबतच्या नियुक्या जारी केल्या. तथापि रायगड आणि नाशिक जिल्हाकरीता केलेल्या पालकमंत्री नियुक्तीला राज्यसरकारनेच दोन दिवसांत स्थगिती दिली.या घटनेमुळे महायुतीच्या प्रमुख दिग्गजांनी नियक्तीचे निकष कोणते लावले याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.ही स्थगिती दिल्याने अन्य जिल्हयांतील पालकमंत्री पदाची नियुक्ती देखिल बदलावी असा सूर उमटत आहे.

सातारा जिल्हयातही असाच सूर घुमू लागला आहे नाशिक आणि रायगड प्रमाणेच सातारा जिल्हयाला न्याय मिळावा अशी
लोकभावना जोर घरु लागली आहे.वास्तविक सातारा जिल्हयाने भाजपाचा एक खासदार आणि चार आमदार निवडुन दिले आहेत.सातारा जावलीचे आमदार तर राज्यामध्ये क्रमांक 2 च्या मताधिक्याने निवड़न आलेले आहेत.तसेच त्याची विधानसभा सदस्य म्हणून पाचवी टर्म असल्याने सर्वात जेष्ठ आहेत. कोरेगांवचे आमदार व कृष्णा खो-याचे उपाध्यक्ष ना महेश शिंदे हे शिवसेनेच्या तिकीटावर निवड़न आले असले तरी त्यांची
आणि,फलटणचे आमदार यांची मुळ नाळ भाजपाचीच आहे, सातारा जिल्हयातील सर्व विधानसभा मतदार संथात महायुतीचेच आमदार निवडुन आलेले आहेत.या कारणांमुळे तसेच अन्य कारणामुळे नाशिक व रायगड पालकमंत्रीबाबतीत ज्याप्रमाणे
नियुक्तीला स्थगिती दिली आहे त्याच प्रमाणे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पदावर केलेल्या नियुक्तीसस्थगिती देवून नवीन पालकमत्री म्हणून अन्य सक्षम निगर्वी आण सर्वाना बरोबर घेवून समतोल विकास साधण्याचा प्रयत्न करणा-या मंत्री महोदयांची नव्याने नियुक्ती केली जावी अशी तीव्र लोकभावना निर्माण झाली आहे.या रास्त आणि न्याय लोकभावनेचा राज्यसरकारने आदर करुन पालकमंत्री न बदलल्यास सातारा जिल्हयात मोठा उठाव होण्याची शक्यता नि्माण झाली असून असहकाराचे हत्यार देखिल उपसले जाण्याची शक्यता आहे
भाजपा, राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या पक्षाच्या निवड़न आलेल्या सर्व आमदारांनी महारष्ट्रतील जिल्हयाच्या पालकमंत्रीपदाबाबत निर्णय वेण्याचे सवाधिकार,एकमुखाने,मुख्यमंत्री ना.देवंद् फडणवीस, उपमुख्यमंत्री .एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना.अजित पवार या
तीघांना दिले असताना आणि महायुतीच्या दिग्गज प्रमुखांनी सातारा जिल्हयाच्या पालकमंत्री पदावर भाजपाच्याच मंत्र्याची नियुक्ती करण्याचे एकमताने ठरवले असतानाही तसे होत नसेल तर निश्चितच जनमानसामध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे. महाराष्ट्रतील सर्व जिल्हयांच्या पालकमंत्री पदाचे नियुक्तीसह
सातारा जिल्हयातील पालकमंत्री पदाचे बाबतीत राज्यशासनाचा कस लागणार आहे हे निश्चित आहे.

Adv