Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District Khatav दिनांक 14 रोजी यमाई देवीची यात्रा

दिनांक 14 रोजी यमाई देवीची यात्रा

359
Adv

औंध श्री यमाई देवीची यात्रा दि.13 ते 29 जानेवारी 2025 या कालावधीत औंध ता. खटाव येथे साजरी होणार आहे. 14 जानेवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे.

या कालावधीत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मुंबई पोलीस अधनियम 1951 चे कलम 36 नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करुन कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस निरीक्षक यांचेसह बंदोबस्तावरील अन्य पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना 13ते 29 जानेवारी 2025 या कालावधीत पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून वाहनांच्या नियमासंदर्भात व यात्रेच्या अनुषंगाने व्यक्तींचे वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.

Adv