जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये वर्षानुवर्षे काही संचालकांच्या आशीर्वादाने एकाच ठिकाणी काम अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील वर्षी होणार असा जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी राजेंद्र सरकळे यांनी दिला याला तब्बल दीड वर्ष झाले तरीही हेच अधिकारी त्याच खुर्चीवर बसून असून नक्की कोणत्या मंत्री महोदयांचा आशीर्वाद या अधिकाऱ्यांना लाभला आहे हे कळायला मार्ग नाही
जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये वर्षानुवर्षी काही संचालकांशी साठे लोटे करून अधिकारी कर्मचारी आपली खुर्ची वाचवतात याला सर्वस्वी जबाबदार आहे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सरकाळे (टेबलाखालून लक्ष्मी दर्शनाची ही चर्चा ) ज्यांचा कालावधी तीन वर्षे पूर्ण झाला असे अधिकाऱ्यांना पुढील वर्षी बदली करणार असा शब्द मात्र या शब्दाला राजेंद्र सरकाळे जागले नाहीत त्यामुळे कोणत्या मंत्र्यांच्या वरद हस्ताने याअधिकाऱ्यांचे मदत करून पुनर्वसन करतात हे सभासदांना कळले नाही
जो जास्त वजनदार संचालक त्याच्या पारड्यात मुख्याधिकारी व काही अधिकारी बसलेले दिसून येतात मात्र कोणत्या नियमानुसार एकाच ठिकाणी हे अधिकारी वर्षानुवर्ष काम करत आहेत याचा लेखाजोका समोर येईलच मात्र राजेंद्र सरकाळे यांची मोहमाया अफाट असल्याची चर्चाही जिल्हा बँकेत तिसऱ्या मजल्यावर दबक्या आवाजात ऐकायला मिळते