
देवी चौक ते मोती चौक वाहतूक कोंडीचा सातारकरांना दररोज सामना करावा लागत असून वाहतूक शाखेचे मुख्य पोलीस अधिकारी अभिजीत यादव यावर तोडगा काढणार का असा प्रश्न सातारकर जनता विचारत आहे
पार्किंगचा अभाव असल्याने वाहतूक कोंडी होत असून पार्किंग मध्ये फोर व्हीलर या आडव्या लावून काही बहादूर आपली जागा आरक्षित करतात त्यामुळे या रस्त्यावरील व्यापारी वर्गाचे पार्किंग कुठे गेले असाही प्रश्न उपस्थित होत आहे
दिवाळी सण तोंडावर असून देवी चौक ते मोती चौक वाहतूक कोंडी ही ठरलीच आहे दुपारी दोन ते पाच या वेळेत सोडून वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना साताऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत असल्याचे रोज पहायला मिळत्ये पोलीस दादा असले काय नसले या मुख्य रस्त्यावर दोन्हीही बाजूला आलिशान चार चाकी कारमध्ये नागरिक बसून आपल्या सोबत आलेल्यांना दुकानात खरेदी करायला पाठवून चारचाकी चालक खुशाल रस्त्यावर गाडीत बसून असतात यावर वाहतूक विभाग कोणतीही कारवाई करत नसून मुख्य कोंडी होण्याचे कारण प्राथमिक तरी हेच असल्याचे दिसून येते
वाहतूक शाखेचे अभिजीत यादव यांनी गेले एक महिन्यापूर्वी मंत्री महोदय यांच्या दारात अपंग व्यक्तींचे आंदोलन झाले होते या आंदोलनात त्यांनी धमक दाखवून आंदोलनकर्त्यांची समज काढण्यात यशस्वी झाले होते तीच धमक देवी चौक ते मोती चौक या राजपथावर वाहतूकोंडी न होण्यासाठी दाखवणार का याकडे सातकारांचे डोळे लागले आहेत