अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदाचा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर एक महिन्याच्या आतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फलटण व कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोळसकर यांच्या गळ्यातच जिल्हाध्यक्ष पदाची माळ घातली आहे? उद्या सकाळी 11 वाजता मुंबई येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी याची अधिकृत घोषणा होणार आहे
सोळशी ग्रामपंचायत उद्घाटनाच्या कार्यक्रमाला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे भाषण सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेब सोळसकर यांच्या मोबाईलवर फोन करून फलटणची उमेदवारी दीपक चव्हाण यांना जाहीर केली होती मात्र महायुतीत न्याय मिळत नसल्याने आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला रामराम करुन तूतारी हाती घेतली त्याच बाळासाहेब सोळस्करांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ घालून अजितदादांनी राजकीय चुणूक दाखवली आहे
बाळासाहेब सोळसकर यांचा महाराष्ट्रात दांडगा जनसंपर्क असून विधानसभेचे माजी सभापती शंकरराव जगताप यांच्या तालमीत तयार झालेले सोळस्कर येणाऱ्या काळात पक्षाला नव संजीवनी कशी देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे