यशराज भोसलेंना संधी मिळावी – मा सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर

667
Adv

फलटण.वाई विधानसभा मतदारसंघातील खंडाळा तालुक्यात विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या गाठी भेटी सुरू असल्याने वाई विधानसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चेला फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी सुरू असलेल्या चर्चेला पुर्ण विराम देत ,उमेदवारी मला नाही तर माझ्या मित्राला म्हणजेच स्व मा खा प्रतापराव भोसले यांचे नातू यशराज भोसले यांना मिळाली पाहिजे असे माझं व्यक्तिगत मत आहे असे सांगितले.
खरंतर खंडाळा तालुक्यातील अनेक गावे ही फलटण मतदार संघात यायची परंतु यामुळे येथील लोकांच्या सोबत नाळ जोडली गेली आहे, आज जरी मतदारसंघ वेगळा झाला असला तरी आमची नाळ येथील जनतेशी जोडली गेली असल्याने आम्ही त्यांच्या गाठीभेटी आजही घेत असल्याचे विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

चौकट
विश्वजितराजे यांनी माझ नाव वाई विधानसभे साठी सुचवलं ह्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारा ह्या मतदारसंघमध्ये मोठा गट आहे जरी पक्षाने रामराजे नाईक निंबाळकर ह्यांच्या कुटुंबातील विश्वजितराजे ह्यांना उमेदवारी दिली तरी आम्ही त्यांचं काम मनापासून करू शेवटी मा शरदचंद्रजी पवार साहेब घेतील तो निर्णय आम्हाला व मतदारसंघातील तमाम पवार साहेब प्रेमींना मान्य राहील असे यशराज भोसले यांनी सांगितले.

Adv