
गेल्या काही महिन्यापासून प्रगतीपथावर असलेले सातारा शहरातील शिवतीर्थाचे काम जून महिन्याच्या अखेरीस पूर्ण होत असून लवकरच नव्या स्वरूपात शिवतीर्थ झळकणार आहे . या कामाची मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी पाहणी केली. यावेळी पालिकेचे मुख्य अभियंता दिलीप चिद्रे व माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे उपस्थित होते.
सातारा शहराची व सातारकरांची अस्मिता असलेले पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांचे लढवय्या अवस्थेतील शिल्प शिवतीर्थ नावाने ओळखले जाते पहिल्या टप्प्यात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अडीच कोटीचा निधी उपलब्ध झाला होता त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने शिवतीर्थाच्या विकसनासाठी सोळा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला . शिवतीर्थाला ऐतिहासिक पद्धतीच्या किल्ल्याच्या तटबंदीचे स्वरूप देण्यात आले आहे येथे विजेची सोय दगडी चबुतरे शिवकालाची आठवण करून देणाऱ्या पायऱ्या असे बांधकाम सध्या सुरू आहे .
शिवतीर्थ लवकरच नव्या स्वरूपात झळकणार असून हे काम येत्या जून महिन्यात अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे .या परिसराची स्वच्छता तसेच विद्युत दिव्यांची नवी झळाळी अशा स्वरूपात शिवतीर्थ सातारा शहराचे वैभव वाढवणार आहे या कामांची मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी अर्धा तास पाहणी केली तसेच ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या






