मतदारांचे ऋणात राहुन आभार व्यक्त करण्यासाठी खा. उदयनराजेंचा आभार दौरा..

940
Adv

नुकत्याच पार पडलेल्यासातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत रयतेने जनाधार देताना,भारतीय जनता पार्टी व विविध घटक पक्षाचे महायुतीमधील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनबद्ध कामाची पोहोच म्हणून मोठया मताधिक्याने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मतदारांनी निवडुन दिले.
उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या लढतीत जय-पराजयाच्या पलिकडे जावून,देशाच्या जनतेने या निकालाकडे पाहीले.
सामान्य मतदारांच्या जोरावर मिळालेल्या या विजयश्रीचे खरे श्रेय महायुतीमधील प्रत्येक कार्यकर्त्यांचे आणिपदाधिकारी यांचे आहे. त्यामुळेच जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या ऋणात राहुनच त्यांच्या विषयी आदरभावयुक्त आभार मानण्यासाठी लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघानिहाय आभार दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.महायुतीला मतदान केलेल्या मतदारांचे प्रामुख्याने आभार मानताना पुढील काळात अधिक सक्षमपणे लोकसेवा जनहितासाठी सुरुच ठेवण्याचा प्रयत्न खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा राहणार आहे.
हा दोन दिवसांचा
आभार दौरा खालीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी सकाळी ११.०० वाजता ‘जितराज’ मंगल कार्यालय कोरेगाव येथे माननीय ना. महेश
दादा शिंदे,मा.डॉ प्रियाताई शिंदे मा .डॉ.अरुणा ताई बर्गे, मा श्री शिवाजीराव महाडिक मा श्री सुनील खत्रीजयवंत पवार मा श्री भरत मुळे यांचे प्रमुख उपस्थितीत व कोरेगाव विधानसभा मतदार संघातील सर्व महायुतीच्या हितचिंतक,सन्माननीय कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे समवेत आभार मेळावा होणार आहे.त्याच दिवशी दि.21रोजीच सायं.६.०० वाजता कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अश्वमेध मंगल कार्यालय मसूर या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम,कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे रामकृष्ण वेताळ चित्रलेखाताई कदम,कुलदीप (अण्णा) क्षीरसागर संपतराव माने (दादा) वासुदेवरावमाने(काका)भीमरावकाका पाटील श्री शंकरकाका शेजवळ, शेतकरी संघटनेचे सचिन नलावडे, जितेंद्र डुबलमनसेचे विकास पवार आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह मायुतीच्या कराड उत्तर मधील कार्यकर्ते, हितचिंतक यांचे समवेत
आभार मेळावा होणार आहे.

शनिवार दिनांक 22 जून 2024 रोजी दुपारी एक वाजता स्वर्गीय बाळासाहेब देसाई शताब्दी सभागृह मरळी तालुका
पाटण या ठिकाणी पालकमंत्री माननीय नामदार श्री शंभुराज देसाई, रविराज देसाई,यशराज देसाई, तसेच माननीय
माजी आमदार नरेंद्र पाटील भारतीय जनता पार्टीचे भरत नाना पाटील विधानसभा निवडणूक प्रमुख विक्रम बाबापाटणकर, महिला आघाडी प्रमुख सौ. कविता कचरे, मा. संजय देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत व पाटण विधानसभामतदार संघातील माहितीचे सर्व हितचिंतक यांचे समवेत आभार मेळाव्याचे आयोजन केले आहे.दि.22 रोजीच सायंकाळी सहा वाजता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. सुरेश (बाबा) भोसले,भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी माननीय डॉ.अतुलबाबा भोसले, विनायकबाबा भोसले माजी आमदार आनंदरावनाना पाटील,विक्रमजी पावसकर कराड दक्षिण शिवसेना नेते माननीय श्री राजेंद्र यादव,कराड दक्षिण विधानसभा निवडणूक प्रमुख धनाजी काका पाटील श्री राजेशजी पाटील,श्री विजु भाऊ यादव श्री सुधीरयेकांडे यांचे सह सर्व हितचिंचक यांचे समवेत आभार मेळावा संपन्न होणार आहे. सदर आभार दौ-यात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड,रिपाई कवाडे गटाचे युवराज कांबळे,मनसे
नेते धैर्यशील पाटील युवराज पवार,डॉ महेश गुरव,हिम्मतराव माने,पवन निकम तसेच महायुतीतील घटक पक्षातील ज्येष्ठ मार्गदर्शक व सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी या कोरेगांव व क-हाड तालुक्यातील आभार मेळाव्यास महायुती मधील सर्व घटकपक्षाच्या कार्यकर्त्यांनी,पदाधिकारी आणि उदयनराजे भोसले यांचेवर प्रेम करणा-या सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जलमंदिर पॅलेस कार्यालयाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा संयोजक श्री सुनील (तात्या) काटकर यांनी केले आहे

Adv