खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पपाटील यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांचा अर्ज वैद्य ठरला आहे
माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांचा अर्ज छाननी मध्ये वैद्य ठरल्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठा दणका बसल्याचे माढा मतदारसंघात बोलले जात आहे
एकतर्फे निवडणूक आहे अशी वलग्ना करणारे खासदार निंबाळकर यांना निवडणुकीआधीच निकाल वेगळा लागणार कि काय याची भीती मनात असल्याची चर्चा माढा लोकसभा मतदारसंघात गावोगावी पाहायला मिळते आज धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती मात्र निवडणूक आयोगाच्या छाननी अर्जामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा अर्ज वैद्य ठरल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला