माढा लोकसभेची उमेदवारी भाजप पक्षाला मिळाल्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून आता कसं महाराज साहेब म्हणतील तसं अशा पोस्ट व्हायरल झाले आहेत
महाराष्ट्रातील भाजपने 20 उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून माढा लोकसभा मतदारसंघातून भाजप पक्षाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादी सह मोहिते पाटील गटात एक प्रकारे नाराजीचा सुरु उमटला आहे त्यामुळे माढा मतदारसंघ महाराष्ट्राचे लक्ष आता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे लागले आहे
रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळू नये म्हणून श्रीमंत रामराजे व मोहिते पाटील यांनी विरोध केला होता मात्र भारतीय जनता पार्टीने माढा मतदारसंघातुन रणजीत निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर प्रचंड नाराजीच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत येणाऱ्या काळात अशीच नाराजी राहिली तर माढा लोकसभा मतदारसंघातून माहितीचा उमेदवार निवडून येणे अवघड होणार असे दिसते