Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Satara District नियोजन समितीच्या निवडीत जिल्हाध्यक्ष तुपाशी कार्यकर्ते उपाशी

नियोजन समितीच्या निवडीत जिल्हाध्यक्ष तुपाशी कार्यकर्ते उपाशी

1098
Adv

जिल्हा नियोजन समितीत जिल्हाध्यक्ष तूपाशी कार्यकर्ते उपाशी अशी अवस्था सातारा जिल्ह्यात झाली आहे दोन्हीही पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षाला दगा देण्याची शक्यता दाट निर्माण झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे .दरम्यान भारतीय जनता पार्टीचे काही नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपली नाराजी व काही पदाधिकाऱ्यांची तक्रार करणार असल्याचे खत्रीलायक वृत्त आहे

ज्या गावात स्वतःच्या पक्षाचा बोर्ड नाही स्वतःची ग्रामपंचायत नाही अशा काही थोर नेत्यांना जिल्हा नियोजन समिती वर निवड करून एक प्रकारे पक्षावर अन्याय केला असल्याचे दिसून येते

कालच सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निवडी जाहीर झाल्या या निवडीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष असलेले धैर्यशील कदम यांची नियुक्ती करण्यात आली तर दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असलेले पुरुषोत्तम जाधव यांचीही या समितीवर निवड करण्यात आली असून या निवडीमुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत मात्र शिस्तबद्ध पक्ष असल्याने जाहीर नाराजी व्यक्त करणार नसल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी खाजगी सांगितले ऐन निवडणुकीत मात्र आम्ही संबंधित पक्षाला आमची किंमत काय हे दाखवून देणार असल्याचेही संबंध पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले

दरवेळेस आम्ही काय फक्त सतरंज्या व हार तुरे उचलायचे का असा प्रश्न कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित करत आहेत दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर पदांची खैरात होणार असेल तर एकनिष्ठ राहून आम्ही काय चूक केली का अशी खदखद ही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष यांची वेळ घेऊन भेट घेणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी खाजगीत सांगितले

Adv