जिल्हाध्यक्षांनी स्वतःच्या कर्तबदारीवर मत मागावीत,सातारकरांचे मत

480
Adv

सध्या राजकारणी लोकांचे सुगीचे दिवस आले असले तरी दुष्काळी पट्ट्यामध्ये विकासाची गंगोत्री आणलेली आहे .असं खोटं नातं बोलून फोटो सेशन करून आपले उंची वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दोन राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचे नाव न घेता स्वतःच्या कर्तबदारीवर निवडणुका जिंकून दाखवाव्यात. असे परखड मत आता सातारकर व्यक्त करू लागलेले आहेत.
राजकारणामध्ये निष्ठा ही अत्यंत महत्त्वाची असते ४०-५० वर्षानंतर काहींना घटनात्मक पद व सन्मान मिळालेला आहे .पण अलीकडच्या काळात निष्ठा म्हणजे निष्ठा थांबू नका.असं वागून काही जण (ज्यांचे नाव सुद्धा प्रसिद्ध करावे एवढी इतकी त्यांची उंची नाही) राजकीय पक्ष बदलत आहेत.राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर स्वतःच्या खिशातली बिसलेरी बाटली सुद्धा विकत न देणारी मंडळी आपल्यामुळेच वरिष्ठ नेत्यांनी दौरा केला आहे.असे भास करून देत आहेत. खरं म्हणजे त्यांच्याच राजकीय पक्षांमध्ये त्यांची ओळख म्हणजे झेड सुरक्षा असलेले राजकीय बॉडीगार्ड अशीच काहींची ओळख आहे कारण,राजकीय नेत्यांसोबत आपली छबी दिसली पाहिजे. यासाठी काही फोटोसेशन करणारे रोजंदारीवर त्यांनी ठेवलेले आहेत.हे आता गुपित उघड झालेले आहे.
राजकीय पक्षाची भूमिका जनतेपर्यंत मांडण्यासाठी प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिलेले आहेत. तसेच आपण कोणती राजकीय भूमिका घ्यावी. यासाठी सुद्धा व्यक्ती स्वतंत्र आहे. संविधानाने तो अधिकार दिलेले आहे. पण, व्यासपीठ दुसऱ्याचं, माइक दुसऱ्याचा पण या काळू- बाळूचा नाट्य प्रयोग मात्र तोच तोच आहे.
लोकसभेच्या एवढ्या जागा जिंकणार? विधानसभेच्या एवढ्या जागा जिंकणार? असे पोट मोठे शब्दप्रयोग करून पत्रकारांचेही मनोरंजन करणारे हे मनोरंजक आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष सुद्धा त्यांचे मत गांभीर्याने घेत नाही. हा भाग वेगळा असला तरी सध्या अशा मंडळींची वाढती क्रेझ निष्ठावंत कार्यकर्त्यांची डोकेदुखी ठरू लागलेली आहे.ज्यांच्या ताब्यात एकही ग्रामपंचायत नाही.सोसायटी नाही संस्था नाही.असे राजकीय सहकार महर्षी अजून किती काळ स्वतःला फसवतील ? हा संशोधनाचा भाग आहे.जनतेने नाकारलेले आहे.मतदारांनी नाकारलेले आहे.हे सांगण्यास मात्र ते कायमचे विसरत आहेत.
एवढेच नव्हे तर कानामागून आले आणि तिखट झाले असे काही पदाधिकारी यांनी आपल्या कर्तबदारीवर ओव्हरटेक करून आपले उद्दिष्ट गाठलेले आहे.या दोन राजकीय पक्षाच्या भूमिकेबाबत विचारधारा वेगळे असले तरी सध्या कमळा पेक्षा पाकळ्या मोठ्या झालेल्या आहेत तर धनुष्याच्या बाणाच्या पाठीमागील बाजू जेवढी आहे.तेवढीच कर्तबदारी असणारी मंडळी स्वतःला राजकीय पक्षाचे चिन्ह जोडत आहे. याबाबत आता मतदार देखील संताप व्यक्त करीत आहेत.हे सुद्धा लपून राहिलेले नाही.
आगामी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवान हालचाली सुरू झालेली आहेत.छ शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा होणे बाकी आहे.परंतु त्यांच्यासाठी एकूणच भाजपसाठी सध्या भाजपचे पदाधिकारी माध्यम समूह सल्लागार व्यक्ती आणि व महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहेत.आत्तापर्यंत त्यांनी प्रचाराची नाही पण संपर्काची दुसरी फेरी पूर्ण केलेली आहे.त्यांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. अद्यापही माढा मतदार संघातील महायुतीचे जागावाटप अद्याप सुरू नाही.पण अंदाज वर्तवण्यामध्ये भाजपला जर ही जागा घेतली तर उमेदवार बदलण्यात येईल किंवा महायुतीला ही जागा सोडण्यात येईल अशी परिस्थिती राजकीय निर्माण झालेली आहे.कारण महायुती मधील दोन बलाढ्य नेते एकमेकांवर शाब्दिक वार करत असल्याने यातून महायुतीचे अनेक कार्यकर्ते घायाळ झालेले आहेत. त्यामुळे निवडणुकी पूर्वीच मिठाचा खडा टाकल्यामुळे राजकीय कालवण बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या सर्व घडामोडींमध्ये या दोन राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची भूमिका ही महायुतीच्या विरोधकांसाठी पावणारा देव ठरलेला आहे.त्यामुळे या दोन जिल्हाध्यक्षांमुळेच महाविकास आघाडीला लोकांचा वाढता पाठिंबा मिळणार असल्याचे मानले जाऊ लागले आहे.

Adv